China Coronavirus Updates: पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा (China Covid Outbreak) कहर पहायला मिळत आहे. चीनमध्ये  80 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी ही माहिती दिली आहे. कोरनामुळे चीनमध्ये अत्यंत भयानक स्थिती निर्माण झाली आहे (China Coronavirus Updates).  चीनमधील स्थिती लक्षाच घेता भारतासहित जगातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये 80 टक्के लोकांना कोरोनाची लागणी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीमुळे खळबळ उडाली. केवळ शहरी भागातच नाही तर चीनच्या ग्रामीण भागातही कोरोना उद्रेक झाला  आहे. 


पुढील दोन ते तीन महिन्यात कोरोनाची मोठी लाट येणार नसल्याचं चायना सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं म्हटल आहे. 2020 मध्ये चीनच्या वुहान लॅबमधून पहिल्यांदा जगभरात कोरोनाचा प्रसार झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा स्फोट झाला आहे. कोरोनाच्या संकटापासून जग आता सावरत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा चीननं जगाचं टेन्शन वाढवल आहे.


12 जानेवारीला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 60 हजार लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  मात्र, हा सरकारी आकडा चुकीचा आहे. घरामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी सरकारने जाहीर केली नसल्याचा आरोप या वैज्ञानिकांनी केला आहे.


चीनमध्ये कोरोनामुळे दररोज 4 ते 5 हजार नागरिकांचा मृत्यू होत आहे.  50 लाख कोरोना रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. बीजिंग शहरातील 80 % लोकसंख्या कोरोनाबाधित झाली आहे.  शांघाय शहरातील 50 % लोकसंख्या कोरोनाग्रस्त झाली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत चीनची 64% लोकसंख्या कोरोना संक्रमित झाली होती. घरात झालेल्या मृत्यूंची चीन सरकारने नोंद केलेली नाही. त्यातच वैज्ञानिकांनी 80 टक्के लोकांना कोरोनाची लागणी झाल्याची धक्कादायक माहिती जाहीर केली आहे. 


चीनमध्ये कोरोनाची अत्यंत भयानक स्थिती आहे. त्यातच चीन सरकार सातत्याने रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी लपवत आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेरीस चीननं एक नावापुरती का होईना एक आकडेवारी जाहीर केली होती. मात्र, चीनच्या वैज्ञानिकांनी जाहीर केलेली आकडेवारी धडकी भरवणारी आहे.