26 Year Old Adult Film Star Death: अमेरिकेतील एका 26 वर्षीय अडल्ट फिल्म स्टारचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. सोफिया लिओन असं या अडल्ट फिल्म स्टारचं नावं असून सध्या तिच्या मृत्यूचा तपास मियामी पोलीस करत आहेत. सोफिया तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. मात्र या अडल्ड फिल्म स्टारच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. 1 मार्च रोजी मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती आता देण्यात आली असून सोफिया घरात बेशुद्धावस्थेत सापडल्याने या मृत्यू मागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.


सावत्र वडिलांनीच दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफियाचे सावत्र वडील माईक रोमिरो यांनी तिच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. रोमिरो यांनी गो फंड मी मेमेरीएल पेजवरुन सोफियाच्या मृत्यूची बातमी दिली आहे. "सोफियाची आई आणि तिच्या कुटुंबाच्यावतीने मी जड अंत:करणाने सांगू इच्छोत की आमच्या लाडक्या सोफियाचं निधन झालं आहे. अचानक सोफियाचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे," असं रोमिरो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


भटकंती आवडायची


"सोफिया 1 मार्च 2024 रोजी तिच्या कुटुंबियांना राहत्या फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. सध्या स्थानिक पोलीस तिच्या मृत्यू प्रकरणात तपास करत आहेत," असंही रोमिरो यांनी मनूद केलं आहे. "सोफिया ही एक उत्तम मुलगी, बहिण, नात आणि मैत्रीण होती. तिला प्राण्यांविषयी विशेष आपुलकी आणि प्रेम होतं," असं सांगत रोमिरो यांनी सोफियाकडे 3 पाळीव प्राणी होते असंही पोस्टमध्ये नमूद केलं आहे. "सोफियाला भटकंती करायला फार आवडायचं. तिला तिच्या ओळखीतील लोकांना आनंदी आणि समाधानी पाहायला आवडायचे," असंही रोमिरो यांनी लेकीबद्दलची आठवण सांगताना म्हटलं आहे. 


व्हॅलेंटाइन्सला केलेली शेवटची पोस्ट


सोफियाचे इन्स्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स असून तिने 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केली होती. अनेकांनी सोफियाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अडल्ट टॅलेंट एजन्सी असलेल्या 'मॉडलिंग 101'ने सोफियाच्या मृत्यूची बातमी शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. "सोफिया लिओनचं अचानक निधन झाल्याने आमचं हृदय पिळवटून निघालं आहे. आपल्यातील एक सुंदर व्यक्तीमत्व हरपलं आहे. तुझ्या आत्म्याला शांती मिळो. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करायचो," असं 'मॉडलिंग 101'ने म्हटलं आहे.


पोलिसांचा तपास आणि गूढ


सोफियाच्या मृत्यूसंदर्भातील गूढ कायम आहे. तिचा मृत्यू 2 आठवड्यांपूर्वी झाला तरी त्याची माहिती एवढ्या उशीराने का जाहीर करण्यात आली? ती राहत्या फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली तर तिच्याबरोबर नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू झाला तेव्हा तिच्याबरोबर घरात कोणी होतं का? यासंदर्भातील तपास आता पोलीस करत आहेत.


मागील 3 महिन्यात अनेकांचा मृत्यू


गेल्या 3 महिन्यांमध्ये ही चौथी घटना आहे ज्यात अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 36 वर्षीय काग्री लिन कार्टरनं आत्महत्या करुन स्वत:ला संपवलं. त्याआधी याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जेसी जेन कोअप ही तिचा प्रियकर ब्रेट हसनमुलरसोबत मृतावस्थेत आढळून आली होती.