लंडन : MP Watching adult movie in Parliament: देशाच्या संसदेत खासदारांमध्ये धोरणात्मक अभ्यासू चर्चा अपेक्षित असतात. मात्र अलीकडेच ब्रिटिश संसदेतून एक अतिशय लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका खासदारावर आरोप आहे की ते संसदेच्या सभागृहात पॉर्न फिल्म पाहत होते. त्यानंतर त्यांना उपस्थित महिला खासदारांनी चांगलीच अद्दल घडवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकशाहीच्या मंदिरांमध्ये आपल्या लोकप्रतिनिधींनी पॉर्न चित्रपट पाहणे ही काही नवीन बाब नाही. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतही अशी प्रकरणे आढळून आली आहेत.


महिला खासदारांचा संताप


'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या संसदेतील एक खासदार आपल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहत होते. त्यानंतर उपस्थित महिला खासदार संतप्त झाल्या. या घटनेनंतर महिला खासदाराने या प्रकरणाची तक्रार केली. इतकेच नाही तर इतर अनेक खासदारांनीही या प्रकरणावर तीव्र विरोध दर्शवला. याप्रकरणी एका महिला खासदाराने आरोपी खासदाराला चांगलंच खडसावलं.


या प्रकरणाबाबत अनेक महिला खासदारांनी आवाज उठवला आहे. एका महिला खासदाराने सांगितलं की, संबधित खासदार पॉर्न पाहत असताना ती त्या खासदाराजवळ बसली होती. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, असे कृत्य करणारे खासदार कोण? त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
आरोपी खासदाराने यापूर्वीही असे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे. पण नंतर ही गोष्ट दडपण्यात आली.


प्रकरणाचा तपास सुरू


खासदाराने संसदेत पॉर्न व्हिडीओ लावल्याप्रकरणाची 'चीफ व्हिप (ख्रिस हीटन हॅरिस) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अहवाल येताच आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.