काबूल : तालिबान्यांनी गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात उच्छाद मांडलाय. यामुळे अफगाणिस्तानचं कधीही न भरुन येणार नुकसान झालंय. परिस्थिती हाताबाहेर चाललीये. देशावर तालिबान्यांकडून हिंसाचार केला जात आहे. या हिसांचारापासून देशाला वाचवण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने तालिबानला सत्तेत भागीदारी देण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. सरकारने ही ऑफर देताना सरकारने एक अटही ठेवली आहे. अशरफ गनी सरकारने शांती प्रस्तावात ही अट ठेवली आहे. त्यानुसार तालिाबान्यांना सत्तेत वाटा तेव्हाच दिला जाईल, जेव्हा ते हल्ला करणार नाहीत. तालिबानने गझनी शहर काबीज केल्यानंतर सरकारने हा प्रस्ताव दिला आहे. (Afghan government offers share in power to Taliban  demands immediate halt to attacks on cities in new peace plan)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगानिस्‍तानच्या 1 टीव्ही न्यूजने सूत्रांच्या माहितीनुसार या शांती प्रस्तावाबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान तालिबान अफगाणिस्तान सरकारच्या ऑफरला होकार देतील याबाबतची शक्यता कमीच आहे.



तालिबानचा प्रांतीय राजधानी गजनीवर ताबा


याआधी तालिबान दहशतवाद्यांनी प्रांतीय राजधानी असलेल्या गजनीवर ताबा मिळवला आहे. गेल्या आठवड्याभरात विद्रोही 10 प्रांतीय राजधान्यांवर ताबा मिळवला आहे. शहारातील बाह्य भागात अजूनही धुमश्चक्री सुरु असल्याबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. तालिबान तिथे आपल्य विजयाचे झेंडे फडकावतेय. अनेक तास सुरु असलेल्या संघर्षानंतर आता शहरात शांततेचं वातावरण आहे. दरम्यान काबुलमध्ये अफगान केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांकडून गजनीवर तालिबान्यांनी ताबा मिळवलाय, याबाबत अजूनही अधिकृत काहीच म्हटलेलं नाही.