नवी दिल्ली : अफगाणिस्तानात एका क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ८ जणांचा मृत्यू झालाय... तर ४५ लोक जखमी झालेत. हा बॉम्बस्फोट अफगाणिस्तानातील जलालाबाद स्थित एका क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीलाच झालेला हा पहिलाच हल्ला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री जवळपास ११ वाजता 'रमजान कप'ची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं दर्शक जमा झाले होते. आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही. दरम्यान, तालिबाननं एका व्हॉटसअप संदेशात आपण या हल्ल्यासाठी जबाबदार नसल्याचं म्हटलंय.  


पाकिस्तानच्या सीमास्थित नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमध्ये तालिबानचा वावर दिसून येतो. इसिसनं सप्टेंबर २०१७ मध्ये काबुलमध्ये एका क्रिकेट मॅचवर झालेल्या आत्मघाती हल्लाची जबाबदारी घेतली होती. यात तीन जण ठार झाले होते तर पाच जण जखमी झाले होते.