नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) सुरु असणारा संघर्ष प्रत्येक क्षणाला आणखी रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. एकिकडे अफगाणिस्तानमधील महत्त्वाच्या राष्ट्रीय वास्तुंमध्ये तालिबाननं (Taliban) घुसखोरी करत तेथे टी पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आलेला असतानाच आता आणखी एक विचलीत करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


देश सोडून जाण्यासाठी अफगाणिस्तानातील नागरिक जीव मुठीत घेऊन पळ काढत आहेत. असं असतानाच ही घटना घडली. विमानानं उड्डाण केलं तेव्हा जीव वाचवण्यासाठी म्हणून काही नागरिकांनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला. विमानाला लटकून प्रवास करण्याच्या उद्देशानं ते लटकले, पण विमान हवेत जाताच हे व्यक्ती उंचावरुन खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार काबुल विमानतळावरुन निघालेल्या या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. 


ल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीप्रमाणेच अफगाणिस्तानमध्ये सध्या विमानतळांवर भीषण गर्दी पाहायला मिळत आहे. शक्य त्या सर्व परिंनी नागरिक देश सोडण्याच्या निर्णयावर पोहोचले आहेत. पण, या गोंधळाच्या आणि दहशतीच्या परिस्थितीमध्ये अनेक चुकीच्या घटना घडत असून निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे.