Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातून निघालेल्या भारतीयांचा जल्लोष... प्रत्येक भारतीयांच्या अंगावर काटा उभा करणारे दृश्य
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या व्हिडीओला ट्विट करत लिहिले की, `जुबिलेंट आपनी घर की यात्रा पर निकले`
काबूल : अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहित आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील सगळ्याच नागरीकांनी तेथीनू बाहेर पडण्यासाठी आपली धडपड सुरू केली. त्यानंतर अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी भारताने देखील आपले विमान पाठवले. शनिवारी उशिरा, ताजिकिस्तानहून 87 लोकांना घेऊन एअर इंडियाचे विमान राजधानी दिल्लीला पोहोचले. त्यात दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे.
संकटग्रस्त अफगाणिस्तानातून परतणे म्हणजे या लोकांसाठी मृत्यूच्या तोंडातून परतण्यासारखे आहे. याक्षणाच्या साक्षीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तानातून सुखरुप निघाल्यानंतर भारतीयांचा आनंद तुम्ही पाहू शकता. भारतीयांचा हा जल्लोष पाहून प्रत्येक भारतीयांच्या अंगावर काटा उभा राहिल.
काबूलहून भारतासाठी रवाना झालेल्या या विमानात भारतीयांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या व्हिडीओला ट्विट करत लिहिले की, "जुबिलेंट आपनी घर की यात्रा पर निकले"
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, 'ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथील आमचे दूतावास अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्यांना मदत करण्यात गुंतले आहे. भारतात आलेल्या या प्रवाशांना प्रथम भारतीय हवाई दलाच्या विमानाने काबूलमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्याला ताजिकिस्तानला नेण्यात आले, तेथून एअर इंडियाच्या विमानाने त्यांना नवी दिल्लीला आणले.'
हे विमान दिल्लीला सुखरुप पोहोचल्यावर सर्व प्रवाशांनी 'भारत माता की जय'च्या घोषणांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
अफगाणिस्तानातून परतलेल्या भारतीय नागरिकाचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची खूप दहशत आहे.
एक भारतीय नागरिक सुब्रत यांनी 15 ऑगस्ट रोजी तालिबान काबूलमध्ये प्रवेश करण्याच्या काही तासांपूर्वी नवी दिल्लीच्या विमानात चढले होते. त्यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी देवाचे आभार मानले.
अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात आहे आणि तेथे राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला आता मायदेशी परतण्याची इच्छा आहे. भारत सरकारचेही यासाठी तीव्र प्रयत्न सुरु आहेत आणि आता दररोज दोन विमाने पाठवण्याची तयारी भारताकडून सुरू आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या पुढाकाराने अमेरिकेने दररोज दोन भारतीय विमानांचे लँडिंग आणि उड्डाण मंजूर केले आहे.