काबूल : Taliban government : तालिबानने बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता मिळवली असेल, पण सरकार चालवणे त्यांना सोपे जाणार नाही, हे आता स्पष्ट दिसून येत आहे. तालिबान मंत्रिमंडळात आता फूट स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तालिबानमध्येच सत्तेसाठी संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कतारसोबच्या महत्वाच्या बैठकीला एक मंत्री दिसले नाहीत. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन तालिबान सरकारच्या घोषणेला काही दिवस उलटले नाहीत, तोवर त्यांच्यात मतभेद दिसून येत आहेत. तालिबान सरकारमधील दरार दिसून येत आहे. कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या काबूल भेटीदरम्यान उपपंतप्रधान मुल्ला बरदार (Mullah Baradar) आणि उप परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास गैरहजर राहण्याचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे. हक्कानी नेटवर्कचा (Haqqani network) सरकारमध्ये दबदबा वाढत असल्याचे म्हटले जातआहे. त्यामुळे तालिबानचे प्रभावी नेते नाराज आहेत. ही तालिबान सरकारमधील सत्ता संघर्षाची सुरुवात मानली जात आहे.


तालिबान सरकारवर प्रश्न उपस्थित 


अफगाणिस्तानात निवडून आलेले सरकार काढून तालिबानने अफगाणिस्तानात आपले सरकार स्थापन केले. बंदुकीच्या जोरावर तालिबानी दहशतवाद्यांनाही सत्ता मिळवली. आता तालिबानचे दहशतवादी मंत्रिमंडळ ज्या देशांकडून मदत करण्याची आशा बाळगते त्यांच्याशी चर्चा करत आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आता जागतिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. हा दहशतवादी देश उभारणीबद्दल बोलत आहेत. पण या चर्चेत तालिबानचे असे काही चेहरे नसण्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.  


बैठकीत हे मंत्री का पोहोचले नाहीत?


अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा झाल्यानंतर कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी अफगाणिस्तानात आले. त्यांनी अफगाण नेते आणि तालिबानी सरकारशी भेट घेतली. पण तालिबानने जारी केलेल्या निवेदनात कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांचे नाव नव्हते. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.


समोर आलेल्या माहितीमध्ये मुल्ला बरादर कोठेही दिसत नव्हते आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले की या अनुपस्थितीचे कारण तालिबानमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेनंतर निर्माण झालेला दुरावा आहे का?


तालिबानमध्ये फूट पडण्याचे कारण काय?


बैठकीत मुल्ला बरादरच्या अनुपस्थितीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना तालिबानने म्हटले की, मुल्ला बरादर अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये आहे. बरदार तालिबानच्या प्रमुखांशी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी गेले आहेत आणि हेब्तुल्लाह अखुंदजादाच्या चर्चेमुळे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.


पण तालिबानच्या या स्पष्टीकरणामुळेही तालिबानमध्ये फूट पडण्याची चर्चा थांबली नाही. कारण इतक्या मोठ्या बैठकीतून तालिबानच्या दोहा राजकीय कार्यालयाचे आणखी एक मोठे नेते आणि तालिबान मंत्रिमंडळातील उप परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास या बैठकीत दिसलेले नाही.


हे चेहरे दिसलेले नाहीत...


दरम्यान, मुल्ला बरादर यांच्याशिवाय, दोहामध्ये भारताशी वाटाघाटी करणारे तालिबानचे नेते आणि तालिबान मंत्रिमंडळातील उप परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास हे देखील तालिबानचे महत्व कमी केल्याने नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कतारच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत तालिबान मंत्रिमंडळाच्या उप -परराष्ट्रमंत्र्यांची अनुपस्थिती देखील तालिबानमध्ये फूट पडण्याचे संकेत देत आहे.


दोहामध्ये भारतासोबत बोलणी करणारा आणि भारतात प्रशिक्षण घेतले, तो तालिबानचा हा नेता बरादार छावणीचाही मानला जातो. अशा परिस्थितीत दोन असंतुष्ट नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे तालिबान सरकारमध्ये दरार पडल्याचे दिसत आहे.