Afghanistan Crises: पोटच्या मुलाच्या सुखासाठी, त्याचे कोणतेही हट्ट पुरवण्यासाठी आई स्वतःच्या इच्छा मागे ठेवते आणि आपल्या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. पण या देशामध्ये मुलांच्या इतर इच्छाच सोडाच, आईला आपल्या पोटच्या लेकराची भूक देखील भागवता येत नाही. या देशाचं नाव आहे अफगाणिस्तान. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानी (Taliban) राजवट लागू झाली तेव्हापासून अफगाणिस्तानी नागरिकांना दोन वेळचं अन्न मिळणं देखील कठीण झालं आहे. (why afghanistan woman giving medicine to kids)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानमध्ये (afghanistan) तालिबानी राजवट लागू झाल्यापासून देशात बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की पालकांना मुलांना पोटभर जेवण देखील देता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. अफगाणिस्तानमधील अशी परिस्थिती अत्यंत भयाण आहे. (taliban afghanistan women)


वाचा | Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?


देशात अनेक पालक कुटुंबाची भुक भागवण्यासाठी आपल्या मुलींची किडनी विकत आहेत. तर काही कुटुंब मुलांनी अन्न मागू नये म्हणून झोपेची औषधं देत आहेत. मुलांनी शांत झोपावं पण खाण्यासाठी अन्न मागू नये अशी प्रार्थना येथील महिला करत आहेत. सध्या संपूर्ण जगात अफगाणिस्तानमधील अशा परिस्थितीमुळे खळबळ माजली आहे. (taliban-afghanistan)


अफगणिस्तानमध्ये असलेल्या परिस्थितीवर तालिबानचं म्हणणं?


तालिबान सध्या रोजगार उपलब्ध करणाऱ्यावर भर देत आहे. अफगणिस्तानला लोखंडाच्या खाणी आणि गॅस पाइप लाइन प्रकल्प सुरु करायचा आहे. अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि अफगाण मालमत्ता गोठवली आहे. (taliban afghanistan war date)


अफगणिस्तामध्ये अशा भयानक दिवसांची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 रोजी झाली. याच दिवशी अफगणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आले. या दिवसापासून अफगणिस्तानमध्ये फक्त महिलाचं नाही तर प्रत्येक जण अनेक संकटांचा सामना करत आहेत. (taliban afghanistan war)