पॅरिस : जगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने एका व्यक्तीला चक्क हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली. त्यामुळे तज्ञांनी विभिन्न मिरच्या वापरताना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. मेडिकल जर्नल बीएमजे केस रिपोर्ट्सनुसार, एका ३४ वर्षीय व्यक्तीने सर्वात तिखट मिरची खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेत त्याने कॅरोलिनारीपर खाल्ले. रिपोर्ट्नुसार, मिरची खाल्यानंतर लगेचच या व्यक्तीच्या गळ्यात आणि डोक्यात भयानक दुखी लागले.


झाला हा गंभीर आजार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने त्याला भयंकर डोकेदुखीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला रिवर्सेबल सेरेब्रल व्हासोकोनट्रक्शन सिंड्रोम (आरसीव्हीएस) असल्याचे समोर आले. यामध्ये डोक्याच्या काही रक्तवाहिन्या संकूचित होतात.


सतर्क राहण्याचा सल्ला


मिरची खाल्यामुळे आरसीव्हीएस झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे समोर आले आहे. त्याच्या तपासण्या केल्यानंतर डेट्रॉयट येथील हेनरी फोर्ड हॉस्पिटलचे डॉक्टर कुलोथुंगन गुणोसेकरन यांनी सांगितले की, हे अतिशय आश्चर्यकारक असून स्तब्ध करणारे आहे. त्यामुळे त्यांनी मिरची खाताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.


यावरुन बनेल कॅन्सरवर औषध


आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी सांगितले की, तिखटपणासाठी जबाबदार असलेली यौगिक प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्याची क्षमता असते. त्यामुळेच यौगित कॅप्सकीनच्या मदतीने एक दिवस कॅन्सरवर बचावात्मक असे इंजेक्शन किंवा औषध बनेल.


संशोधन करणारे अशोक कुमार मिश्रा आणि जितेंद्रिया स्वॅन यांनी सांगितले की यावरून कॅन्सरवर उपचाराचा सोपा मार्ग सापडेल. सुमारे १० वर्षांच्या संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे की प्रॉस्टेट कॅन्सर सेल्स मारू शकतात.