ह्यूस्टन : जन्मदात्या आईनेच आपल्या नवजात बालकासोबत केलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये एक महिलेने मुलीला जन्म दिल्यानंतर अपार्टमेंटच्या बाहेर मुंग्यांच्या घोळक्यात फेकून दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिका-यांनी सांगितले की, जेव्हा ते बाळाजवळ पोहोचले तेव्हा मुग्यांनी ती पूर्णपणे झाकली गेली होती. या २१ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटकही करण्यात आली आहे.


सिडनी असे या महिलेचे नाव आहे. अपार्टमेंटमध्ये राहणा-या एक अन्य व्यक्तीने गेल्या गुरूवारी नवजात मुलीला अपार्टमेंटच्या बाहेर पाहिले होते. त्या जागेपासून सिडनीच्या त्या अपार्टमेंटपर्यंत रक्ताचे डाग मिळालेत, जिथे काही तासांपूर्वी तिने मुलीला जन्म दिला होता. 


या महिलेने अधिका-यांना माहिती दिली की, ती गर्भवती असल्याचे तिला माहिती नव्हते. तसेच तिला या गोष्टीची भीती होती की, पती आणि तिच्यात हे बाळ येईल. मुलीच्या वडीलावर कोणताही आरोप नाही लावण्यात आलाय. तर मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता न्यायालय या गोष्टीचा निर्णय घेणार की मुलीचं संरक्षण कुणाला सोपवलं जाईल.