ढाका : शेजारील देश म्यानमारमधून बांगलादेशमध्ये स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फॅमिली प्लानिंग ऑथॉरिटीने सरकारला याबाबतचे आदेश दिलेत. दरम्यान हे अनिवार्य असणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, लोकसंख्या नियंत्रणसाठी सुरुवातीला अधिकाऱ्यांना कंडोमच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुस्लिम कंडोमचा वापर करण्यास टाळाटाळ करतात. यामुळेच केवळ आतापर्यंत ५४९ कंडोमची पाकिटे वाटली गेली. अनेक महिलांनी तर आपल्या नवऱ्याने कंडोमचा वापर करणे चुकीचे वाटते. 


रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये ६ लाखाहून अधिक रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशच्या रिफ्युजी कँपमध्ये आलेत. बांगलादेशमधील रिफ्युजी कँपमधील रोहिंग्यांची संख्या १० लाखाहून अधिक असल्याची माहिती आलीये. 


स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, रोहिंग्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. अनेकांना तर १९ मुलेही आहेत. काही पुरुषांच्या तर एकाहून अधिक बायका आहेत. यामुळेच अधिकाऱ्यांनी पुरुष आणि महिला या दोघांची नसबंदी करण्याची योजना सुरु केली. दरम्यान, यामध्येही अडथळे येऊ शकतात. कँपमधील अनेकांना वाटते की मोठे कुटुंब असल्याने त्यांना कँपमध्ये राहण्यास सोयीस्कर जाते. अनेक रोहिंग्या मुस्लिमांना कंडोम वापरणे इस्लामविरोधी वाटते