बीजिंग: केवळ भारतच नव्हे तर, जगभरात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांना पायबंद कसा घालायचा यावर विचार सुरू आहे. भारताचे शेजारी राष्ट्र चीनमध्येही यावर विचार सुरू आहे. दरम्यान, चीनने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला आहे. महिला अत्याचाराविरोधात कायदे कडक करतानाच चीनने आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रात्री १२ वाजलेनंतर पुरूष चालक हे स्त्री प्रवाशाला घेऊन प्रवास करू शकत नाहीत. रात्री १२ नंतर स्त्री प्रवाशाला पुरूष चालकाने सेवा दिल्यास ते कायद्याचे उल्लंघन ठरू शकते. अर्थात, या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत हा कायदा लागू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॅक्सीमध्ये बलात्कार झाल्याच्या दोन घटना पुढे आल्यावर चीनमध्ये हा नियम बनवला आहे. लक्षेवेधी असे की, हा नियम लागू केल्यावर पुरूष चालकांची जागा कोण भरून काढणार हा मुद्दा पुढे येतो. पण, किमान बीजिंगमध्ये तरी हा मुद्दा निकाली निघतो. कारण, बीजिंगमध्ये रात्रीच्या वेळी सेवा देऊ शकतील इतकी महिला टॅक्सी चालकांची संख्या असल्याचे सांगितले जाते. रात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत हा कायदा लागू असणार आहे.


बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायदा


एका २१ वर्षीय महिलेची टॅक्सी चालकाने बलात्कार करून हत्या केली. हा चालक आपल्या वडिलांची टॅक्सी चालवत असल्याची प्राथमिक माहिती होती. दरम्यान, पेईचिंगमधून गावाकडे निघालेल्या एका महिलेवरही ३५ वर्षीय इसमाने टॅक्सीत बलात्कर केल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.