कोरोनाचे सावट : जगातील विमान सेवेवर मोठा परिणाम, अनेक उड्डाणे रद्द
कोरोना व्हायरस वाढता प्रसार रोखण्यासाठी जगभरातील विमान कंपन्यांनी आपली सेवा तातपुरती स्थगित केली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरस वाढता प्रसार रोखण्यासाठी जगभरातील विमान कंपन्यांनी आपली सेवा तातपुरती स्थगित केली आहे. काही उड्डाणे रद्द केली आहेत. रशियाला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने रशिया, मिलान आणि सेऊलला जाणारी आपली विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे. त्याआधी इटली आणि दक्षिण कोरियाची विमान उड्डाने एअर इंडियाने रद्द केली होती. आता रशियाला जाणारी विमान सेवा १२ मार्चपर्यंत रद्द केली आहे, तर मिलान आणि सेऊल जाणारी विमानं सेवा १४ मार्च ते २८ मार्चपर्यंत बंद राहील, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
एअर इंडियाने या देशांची विमाने केली रद्द
दरम्यान, कोरोनाचा प्रसार हा परदेशात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे काल एअर इंडियाच्या विमानाने मिलान येथून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. विमानातले कर्मचारी आणि पायलट यांनाही १४ दिवासांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच अनेक सेवा स्थगित केल्या आहेत. यात चीनकडे जाणारी विमान सेवा अमेरिका, फ्रान्स या देशांनी थांबवली आहे. मेनेलँडने चीनची सर्व विमान उड्डाने रद्द केली आहेत. अमेरिकन एअरलाइन्सने चीन आणि हाँगकाँगच्या उड्डाणांची तारीख वाढवली आहे. त्यामुळे विमान उड्डान २४ एप्रिलपर्यंत होणार नाही.
एअर फ्रान्सने मार्च अखेरपर्यंत चीनला जाणारी विमान उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाने शांघाय, हाँगकाँगसाठी ३० जूनपर्यंत उड्डाणे बंद केली आहेत. एअर सियोलने पुढील सूचना येईपर्यंत चीनची उड्डाणे स्थगित केली आहेत. एअर टांझानियाने फेब्रुवारीमध्ये चीनसाठी आपली सेवा सुरू करण्याची योजना आखली होती. मात्र, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन ही विमान उड्डाणाची सेवा पुढे ढकलली आहे.