Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला गेलं तर ही सर्वसामान्य बाब वाटेल. पण या लिंबूची किंमत लाखांच्या घरात आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचं कपाट उघडण्यात आलं. यामध्ये त्यांनी ठेवलेली किंमती वस्तू हाती लागली आहे. निरुपयोगी दिसणाऱ्या वस्तूची किंमत लाखोंच्या घरात आहे. इंग्लंडमध्ये झालेला लिलाव हा जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. मृत इसमाच्या कपाटात सापडलेले लिंबू तब्बल 285 वर्षे जुने आहे.


साधारण 2 इंचाच हे लिंबू घरच्या साफसफाई दरम्यान कपाटात सापडले पण लाखोची बोली लागायला या लिंबात असे नेमके काय गुण आहेत? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे उत्तर जाणून घेऊया. 


इंग्लडच्या श्रॉपशायरमध्ये ब्रेटेल्समध्ये घराचा लिलाव करण्यात आला. एका व्यक्तीला त्याच्या काकांच्या घरातील छोट्याशा कपाटात हे लिंबू सापडले. ते 19 व्या शतकातील असल्याचे त्याला समजले. हे लिंबू मौल्यवान असू शकते, असे त्याला वाटले. त्यामुळे घरासोबत लिंबू देखील लिलावाला ठेवले. एखाद्याचे वर्षभराचे घरभाडे येईल, इतकी या छोट्याशा दिसणाऱ्या लिंबूची किंमत आहे. 


या लिंबूची किंमत 4 हजार 200 ते 6 हजार 300 रुपयाचा अंदाड डेविड्र ब्रेटेल यांना वाटत होता. पण याचा लिलाव 1 हजार 400 पाऊंड म्हणजेच 1 लाख 47 हजार रुपये इतका पोहोचला. तसेच ते छोटे वाटणारे कपाट 32 पाऊंड म्हणजेच साधारण 3 हजार 360 रुपयांना विकले गेले. 


जगभरात अनेक ऐतिहासिक मौल्यवान गोष्टींचे होणारे लिलाव डोळे विस्फारणारे असतात. गेल्या वर्षी जून महिन्यात लंडनमध्ये राहणाऱ्या राजकुमार विलियम्स आणि कॅथरिन मिडलटन यांच्या लग्नाचा केकचा तुकडा 1700 पाऊंड म्हणजेच 1.78 लाख रुपयांना खरेदी केला गेला. त्यामुळे मौल्यवान  वस्तू लिलावाद्वारे खरेदी करण्यांबद्दलच्या चर्चा समोर येत असतात. त्यांना आवडलेल्या गोष्टीसाठी ते कितीही रुपये खर्च करायला तयार असतात, हे विशेष.