मुंबई : श्रीमंत लोकांच्या घरासमोर गाड्या उभ्या असल्याचे तुम्ही जगभर पाहिले असेल. लोक कार किंवा बाईक घेऊन ऑफिसला जातात आणि रस्त्यावरही आपल्याला फक्त कार, बस यांसारखीच साधने दिसतात. पण, अमेरिकेत एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला प्रत्येक घराबाहेर विमान उभं राहिलेलं दिसेल. आता तुम्ही म्हणाल की, ते फक्त शोचं विमान असावं. पण असं नाही, हे खरंखुरं विमान आहे आणि येथील लोक स्वत:चं विमान घेऊन ऑफिसला देखील जातात. आश्चर्यचकीत झालात ना? चला या ठिकाणाची रंजक कहाणी जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ठिकाण कॅलिफोर्नियातील कॅमेरून एअरपार्क आहे. येथे राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडे विमान आहे. येथील जवळपास प्रत्येक रहिवासी कोणत्या ना कोणत्या मार्गाने विमान उद्योगाशी संबंधित आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीची छाप तुम्हाला इथल्या रस्त्यावरही पाहायला मिळेल.


सामान्य शहरांमध्ये घरांसमोर जेथे कार पार्किंग केली जाते, तुम्हाला कॅमेरॉन एअरपार्कमध्ये विमान ठेवण्यासाठी पार्किंग दिसतील. येथी रस्त्यांची नावं देखील विमान वाहतुकीशी संबंधित आहेत.


आता प्रश्न हा उभा राहातो की, इथे फक्त विमानच विमान का आहे?


मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरही एअरफील्ड अमेरिकेतच होते. अमेरिकेत हवाई वैमानिकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आणि 1946 पर्यंत वैमानिकांची संख्या 4 लाख झाली. अमेरिकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने निवृत्त वैमानिकांचा बंदोबस्त करण्यासाठी निष्क्रिय लष्करी लेन्स वापरण्याचा विचार केला आणि देशात अनेक ठिकाणी निवासी हवाई क्षेत्रे बांधण्याचा प्रस्ताव दिला.


असे लोक या निवासी एअरफिल्ड्समध्ये स्थायिक झाले होते जे कोणत्या ना कोणत्या मार्गाने विमानसेवेशी संबंधित होते. कॅलिफोर्नियामध्ये कॅमेरॉन एअरपार्क नावाने असेच एक निवासी एअर पार्क स्थापन करण्यात आले. विमानसेवेशी निगडीत असल्यामुळे येथे राहणाऱ्या जवळपास प्रत्येक नागरिकाला विमानाचे वेड आहे.


विमान खरेदी


@thesoulfamily या TikTok वापरकर्त्याने त्याच्या एका व्हिडीओमध्ये दाखवले आहे की येथे राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडे अशी विमाने आहेत. त्यांना ठेवण्यासाठी हँगर्स बनवण्यात आले आहेत. येथे विमान खरेदी करणे हे कार खरेदी करण्याइतकेच सामान्य आहे.


तुम्हाला इथल्या रस्त्यांवर सामान्य विमाने दिसतील. याचे कारण म्हणजे येथील लोकही विमानाने ऑफिसला जातात. येथील रस्ते अतिशय रुंद करण्यात आले आहेत. लोक आरामात त्यांची विमाने जवळच्या एअरफील्डवर नेण्यासाठी हे केले गेले आहे. रस्ते इतके रुंद आहेत की त्यावरून विमान आणि कार सहज जाऊ शकते. कॅमेरून एअरपार्कच्या रस्त्यांवरील साईन बोर्ड आणि लेटरबॉक्सेस सामान्य उंचीपेक्षा किंचित खाली लावले आहेत, जेणेकरून विमानाच्या पंखांना त्यांचे किंवा विमानाचे कोणतेही नुकसान होणार नाही.