मुंबई : लग्न हा आयुष्यातला एक असा क्षण असतो जो, प्रत्येकाला अविस्मरणीय बनवायचा असतो. अनेक विवाह अनेकदा त्यांच्या भव्यतेमुळे, वेगळ्या शैलीमुळे किंवा वधू-वरांच्या वेगळ्या एन्ट्रीमुळे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. परंतु सध्या एका अशा लग्नाबद्दल बातमी समोर आली आहे, जे लग्न जगभरात हेडलाइन बनत आहे. विशेष बाब म्हणजे हे लग्न मेक्सिकोमध्ये झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो मेक्सिकोच्या सॅन पेड्रो हुआमेलुला शहराचा महापौर आहे.


होय, तुम्ही बरोबर ऐकलात, एवढ्या मोठ्या व्यक्तीनंच असा विचित्र प्रकार केला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेक्सिकोच्या सॅन पेड्रो हुआमेल्युलाचे महापौर क्वेटर ह्यूगो यांनी हे अनोखं लग्न केलं आहे. या लग्नाला हजारो लोक उपस्थित होते आणि वराच्या नातेवाईकांनीही सर्व विधी पार पाडले. आता तुम्हाला हा ही प्रश्न पडला असेल की, हे सगळं कशासाठी? तर यामागचं कारण तुम्हाला आश्चर्यचकीत करेल.



या खास लग्नामागील कारणही खूप खास आहे. वास्तविक ही मेक्सिकोची जुनी परंपरा आहे. माणसाचे पर्यावरण आणि प्राणी यांच्याशी असलेले नाते घट्ट करण्यासाठी अशा प्रकारचे लग्न केले जाते.


असे केल्याने भगवंताकडून इच्छित वस्तू प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. चांगला पाऊस आणि जास्त मासे मिळावेत यासाठीच बहुतेक लोक असे कार्यक्रम आयोजित करतात. महापौरांनीही याच हेतूने हा विवाह केला.


मेक्सिकोमध्ये मगरीशी लग्न करण्याची परंपरा खूप जुनी आहे. ही परंपरा 1789 पासून सुरू असल्याचे येथील लोक सांगतात. विधी करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. लोक प्रथम मगरीचे नाव ठेवतात. त्यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली जाते. लग्नाच्या दिवशी नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित केले जाते. यानंतर सर्वांसमोर विवाह पार पाडला जातो.