मुंबई : आपल्याकडे भारतात वेगवेगळ्या प्रकारे लग्न झालेले तुम्ही पाहिले असेल, परंतु सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या लग्नाची चर्चा होत आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. भारत असो किंवा विदेश सर्वत्र लग्न हे दोन लोकांच्या संपतीनं केलं जातं. परंतु हे लग्न तीन लोकांच्या संमतीने झालं आहे, हो तुम्ही बरोबर ऐकलंत. हे एकायला विचित्र वाटत असलं तरी, हे लग्न तीन लोकांमध्ये झालं आहे. अमेरिकेतील एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा किस्सा त्या मुलीने स्वतः शेअर केला आहे. तरुणीनेच एका पोस्टमध्ये तिघांचे लग्न आणि एकत्र राहण्याबद्दल लोकांना सांगितले.


या अनोख्या लग्नाची कहाणी 26 वर्षीय एंजल बेलीमुळे सुरु झाली. खरंतर, एंजलाने 28 वर्षीय टायलर हेसला 2018 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. दोघे टिंडरवर एकमेकांना भेटले आणि त्यांची ही मैत्री प्रेमात बदलली, ज्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला.


परंतु या दरम्याने ते 23 वर्षीय सॅम विकला भेटले आणि त्यांनी सॅमलाही आपल्या नात्यात आणण्याचं ठरवलं.


खरंतर एंजल आणि सॅम कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. कॉलेजपासूनच त्यांच्यात चांगले नाते तयार झाले होते. 2019 मध्ये हे दोघे पुन्हा भेटले आणि जुन्या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. यामुळे तिघेही एकत्र नात्यात आले आणि त्यांनी लग्न केले.


सुरुवातीला तिघांमध्ये खूप अडचणी तयार झाल्या होत्या. सॅम आणि टायलरला एकत्र पाहून एंजलला राग देखील यायचा, परंतु नंतर त्यांनी यावर एक पर्याय शोधून काढला. या तिघांनी मिळून टाइम टेबल बनवले. टाइम टेबलमुळे तिघांचाही एकमेकांच्या वेळेचा प्रश्न सुटला. ज्यानंतर हे तिघेही एकत्र प्रेमाने राहू लागले.


टाईम टेबलनुसार एंजला कामावर जाते तेव्हा टायलर आणि सॅम एकत्र वेळ घालवतात. त्याचबरोबर वेळेनुसार प्रत्येकाला एकमेकांसोबत व्यवस्थित वेळ घालवण्याची संधी मिळते.