मुंबई : अमेरिकेतील कोलोरॅडोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकल्यावर तुमचं डोकं देखील चक्रावेल. खरंतर न्यायलयाने का महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा ठोठावली आहे, कारण तिचा सहकारी पोलीस एका वृद्ध महिलेशी गैरवर्तन करत असताना ती हसत होती. या घटनेत वृद्ध महिलेच्या हाताचे हाड मोडले. आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्याने घटनेदरम्यान वृद्ध महिलेच्या बाजून काहीही बोलले नाही, शिवाय आपल्या सहकाऱ्याला देखील असं करण्यापासून थांबवले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर जेव्हा न्यायाधीशांनी 12 मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तेव्हा त्यांना या गोष्टीचा उलगडा झाल. ज्यानंतर न्यायालयाने महिला पोलीस कर्मचाऱ्याला तुरुंगात टाकण्याची शिक्षा सुनावली.


द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्याला 45 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याचे हे कृत्य त्याच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या डोक्याला लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.


नक्की काय घडलं?


28 वर्षीय पोलिस कर्मचारी ऑस्टिनने 73 वर्षीय वृद्ध महिला कॅरेन गार्नरसोबत गैरवर्तन केले. त्याने वृद्ध महिलेचा हात आधी मुरडला आणि नंतर तिला जमिनीवर पाडले. यादरम्यान वृद्ध महिलेचा हात तुटला.


आता प्रश्न हा उभा राहातो की, वृद्ध महिलेशी गैरवर्तन का केलं?


सहकारी पोलिस कर्मचाऱ्याच्या कृत्यावर हसणाऱ्या महिला पोलिसाचे नाव दर्या जलाली आहे. विशेष म्हणजे दारिया जलालीच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध महिलेशी गैरवर्तन केले, कारण तिने कथितरित्या फुलांचे पैसे न देता दुकान सोडले होते. त्या फुलांची किंमत $14 म्हणजेच सुमारे 1 हजार 115 रुपये होती.


पीडित वृद्ध महिलेच्या मुलीने सांगितले की, जेव्हाही मी या घटनेचे फुटेज पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आले. पोलिस कर्मचारी ऑस्टिन आणि दर्या जलाली यांनी माझ्या आईसोबत गैरवर्तन केले. या दोघांनी माझ्या आईसोबत कसे गैरवर्तन केले, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.


दारिया जलाली आणि ऑस्टिन यांना मारहाणीसाठी नव्हे तर लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा गणवेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एवढं भयानक दृश्य पाहून जलालीला कसं हसू आलं ते समजलं नाही.