मुंबई : आपल्याला तर हे माहितच आहे की, जगातील कोणत्याही भागात आपण गेलो. तरी तेथील वेगवेगळे नियम असतात. प्रत्येक देशात वेगवेगळे नियम असले, तरी नियम मात्र नक्की असतात. परंतु तुम्हाला जर सांगितलं की, जगात असं एक ठिकाण आहे, जेथे तुम्हाला कोणतंही नियम लावलं जाणार नाही तर? कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे खरं आहे. जगात असं एक ठिकण आहे. जेथे तुम्हाला ना कोणता कर भरावा लागत, ना कोणत्या गोष्टीचं भाडं भरावं लागतं. एवढंच काय तर येथे कशासाठी ही नियम देखीस नाहीय. येथे राहणारे लोक हे कोणत्याही प्रकारच्या बंधनात बांधलेले नाहीत, ते पूर्णपणे मुक्त आहेत. या भागाला पृथ्‍वीची लॉलेस सिटी (Inside Slab City) असे म्हणतात. चला तर या आगळ्या वेगळ्या जागेबद्दल जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टीव्ही चॅनलचे होस्ट बेन फोगले ( Ben Fogle) यांनी त्यांच्या कार्यक्रमात या ठिकाणा विषयी माहिती सांगितली आहे. त्यांनी स्वत: या ठिकाणी जाऊन स्लॅब सिटीबाबत (Inside Slab City) सांगितले आहे.


कॅलिफोर्निया, यूएसए मध्ये असलेल्या या ठिकाणी ना कोणतेही नियम आहेत, ना कायदे. तसेच येथे सरकार नावाची कोणतीही गोष्ट नाही.


या भागात असेच लोक राहातात, जे एकतर न्यायापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मग कोणत्या तरी मानसीक त्रासाने ग्रस्त आहेत. तसेच या ठिकाणी बंदुका आणि ड्रग्जची विक्री सर्रास सुरू असते आणि येथे त्यांना कोणीही रोखत नाही.



अखेर हे स्लॅब शहर कसे तयार झाले?


डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, चॅनल 5 साठी डॉक्युमेंट्री बनवणारा बेन फोगले या शहरात पोहोचला होता. वाळवंटी भागात वसलेल्या या शहरात ना पाण्याची व्यवस्था आहे ना गॅस, ना वीज आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन सैनिकांनी प्रशिक्षणासाठी ही जागा बनवली होती, जी 1956 मध्ये उद्ध्वस्त करण्यात आली होती.


ही जागा ढिगाऱ्यात बदलली होती, जी हळूहळू भटक्या आणि माजी सैनिकांसाठी राहण्याची जागा बनली. येथे राहणारे लोक सामाजिकदृष्ट्या इतर भागांपासून तुटलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तेथील लोकांना पाहाल तर ते आपल्याला थोडे विचित्र वाटेल, तसेच त्यांना कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसेल.


ना घड्याळ, ना कॅलेंडर ना टीव्ही


बेन फोगल यांच्या मते, या ठिकाणच्या लोकांचा जगाशी काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे एकही घड्याळ नाही, ज्यामुळे त्यांना वेळ कळू शकेल, ना त्यांच्याकडे दिवस मोजण्यासाठी कॅलेंडर आहे. तसेच ना त्यांच्याकडे कोणताही टिव्ही आहे, ज्यामुळे त्यांना जगात काय सुरु आहे याबद्दल माहिती मिळेल.


या शहरातील बरेच लोक विचित्र कपडे घालतात. येथे गुन्हे करून पळून गेलेले अनेक लोक आहेत, तर जे लोक सामान्य जगात ज्या गोष्टी करू शकत नाहीत ते करण्यासाठी येथे येतात. कायद्याचा अभाव हा इथला सर्वात मोठा दोष आहे.