दहशतवादी संघटना अल कायदाचा चीफ अल जवाहिरी जिवंत? 9/11 च्या स्मृतीनदिनी समोर आला व्हिडिओ
अल कायदाचा चीफ अल जवाहिरीच्या जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे
काबुल : अल कायदाचा चीफ अल जवाहिरीच्या जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 11 सप्टेंबर रोजी झाला होता. त्याच्या स्मृतीनदिनी अल जवाहिरी अल कायदाच्या भविष्याविषयी भाषण करताना दिसून आला आहे.
अमेरिकेने केला होता दावा
अमेरिकेने 2020 मध्ये जवाहिरीला ठार केल्याचा दावा केला होता. परंतु तोच जवाहिरी व्हिडिओमध्ये 9/11 च्या हल्लेखोरांबाबत भाष्य करताना दिसून आला.
कोण आहे आयमान अल जवाहिरी?
जाणून घेऊ या की, अल जवाहिरीचा जन्म इजिप्तच्या कायरोमध्ये 19 जून 1951 मध्ये झाला होता.15 वर्षाच्या वयातच अल जवाहिरीचे संबध मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेशी आहे. 1974 मध्ये त्याने काहिरामधून MBBS केले. 1978 मध्ये अल जवाहिरीने मास्टर ऑफ सर्जरीची डिग्री घेतली.
इजिप्तच्या राष्ट्रपतीच्या हत्येचा आरोपी
इजिप्तचे माजी राष्ट्रपती अनवर सादातच्या हत्येचा आरोप अल जवाहिरीवर आहे. अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. ऑक्टोबर 2001 मध्ये अल जवाहिरीला अफगानिस्तानात पाहण्यात आले.