नवी दिल्ली: परीक्षेदरम्यान होत असलेल्या कॉपी प्रकरणांची देशभरात चर्चा होते. ते थांबविण्यासाठी चर्चा झडतात. पण, परीक्षेदरम्यान कॉपी रोखणे हा केवळ भारतासमोरीलच विषय नाही. जगभरातील अनेक देश परीक्षेदरम्यान कॉपी करण्यापासून विद्यार्थ्यांना कसे रोखाता येईल यावर विचार करत आहेत. अल्जिरीयाने तर कॉपी रोखण्यावर हटके पाऊल उचलले आहे. अल्जिरियात बुधवारपासून शाळाशाळांमधून डिप्लोमा एग्झाम सुरू झाल्या. या काळात कॉपी रोखण्यासाठी अल्जिरीयाने चक्क देशांतर्गत इंटरनेट सेवाच पूर्णपणे बंद केली आहे.


इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारणपणे परीक्षा सुरू असल्याच्या कालावधीत देशातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प राहिली. अल्जिरी टेलिकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने आदेश दिल्यामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. परीक्षेदेरम्यान केली जाणारी कॉपी तसेच, परीक्षेत येणारा अडथळा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. 


सरकारचे आदेश पाळणे ऑपरेटर्ससाठी बंधनकारक


दरम्यान, यापुढे परीक्षा संपेपर्यंत हा निर्णय कायम एसेल. अल्जिरीयात सुमारे ७ लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी इंटरनेट ब्लॅकआऊट कायम राहिल. या परीक्षा सोमवार पर्यंत सुरू असतील. टेलिकॉम असोशिएशन  AOTA चे अध्यक्ष अली कहलाने यांनी सांगितले की, ऑपरेटर्सनी सरकारचे आदेश पाळणे बंधनकारक आहे. 


पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचे पाऊल


प्राप्त माहितीनुसार, अल्जिरियात २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेवेळी मोठ्या प्रमाणावर कॉपी झाली होती. त्यामुळे देशातील परीक्षापद्धतीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केरत आक्षेप घेण्यात आला होता. सोशल मीडियावरून सरकारवर तीव्र टीकाही करण्यात आली होती. त्यामुळे सरकारने यांदा हे पाऊल उचलले. विशेष म्हणजे २००० हजार परीक्षा केंद्र परीसरात इंटरनेट एक्सेस असलेल्या यंणाही सरकारने ताब्यात घेतल्या आहेत.