7000 वर्षांपूर्वीपासूनच पृथ्वीवर एलियनचा वावर? कुवेतमधील `त्या` मूर्तीनं वाढवलं गूढ
कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मनात उद्भवत आहे.
कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. यामुळे पुरातत्वशास्त्रज्ञसुद्धा चकित झाले आहेत. जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न आता त्यामुळे डोके वर काढत आहे. एलियनना पाहून मानवाने ही कलाकृती साकारली असेल असा अंदाज त्यामुळे बांधला जात आहे. अशा आकारांच्या कलाकृती मेसोपोटेमिया मध्ये देखील सापडल्या होत्या.
ही मूर्ती जवळपास 7000 वर्ष जुनी असून, तिचा आकार आणि रचना काहीशी एलियनशी मिळतीजुळती असल्याचे म्हटले जात आहे. कुवेत आणि अरेबियन खाडीच्या परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारची मूर्ती सापडली. ही एक छोटीशी कोरीव मातीची मुर्ती आहे ज्यात अतिशय बारकाईनं कारागिरी पहायला मिळाली. या मूर्तीचे डोळे बारीक आणि लांब, नाक चपटे तसेच कवटी लांब आणि मोठी आहे. या मूर्तीला उत्तरी कुवेतच्या 'बहरा 1' या प्राचीन साइटने शोधले आहे.
या परिसरात 2009 पासून खोदकाम चालू आहे. 'बहरा 1' हा अरबी प्रायद्वीपचा सगळ्यात जुना निवासी परिसर आहे. तिथे जवळपास 5500 ते 4900 ई.स पूर्वपासून मानवी वस्ती अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. त्याकाळी तिथे 'उबेद' नामक लोक राहत होते जे मेसोपोटेमिया मध्ये आले होते. ते त्यांच्या हस्तकला आणि मातीच्या सामानांच्या कारागिरीसाठी ओळखले जात होते.
हे ही वाचा: ''या' ब्लड ग्रुपला कॅन्सरचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या काय सांगतो तुमचा Blood Group
बहरा 1 या ठिकाणावर खोदकाम करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ अग्निएस्का शिमजॅक म्हणतात की उबेद नंतरच्या काळात नियोलिथिक (अरेबियन खाडीतील नवीन समाज) सोबत मिळाले. ही जवळपास 7000 वर्ष जुनी गोष्ट आहे. या समुदायातील परस्पर सलोख्यामुळे सांस्कृतिक बदल झाला.
शिमजॅक यांच्या मते या परिसरामधून दीड हजार प्राचीन वस्तू सापडल्या परंतु ही मातीची मूर्ती वेगळी आणि अद्वितीय आहे. ही मूर्ती मेसोपोटेमियन मातीपासून बनली आहे. उबेद समुदायातील लोकांच्या मूर्तींमध्ये अनेकदा पाली, पक्षी आणि सापाची डोकी असलेल्या मूर्ती सापडत आल्या आहेत परंतु पहिल्यांदाच एलियनचा आकार असलेल्या मूर्तीला पाहून संपुर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे.