मगरीने केलेल्या हल्ल्यात एका 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली आहे. फ्लोरिडा येथील Fort Pierce येथे ही घटना घडली आहे. महिला आपल्या श्वानासह फिरण्यासाठी गेली होती. यावेळी मगरीने अचानक श्वानावर हल्ला केला. यानंतर महिला श्वानाला वाचवण्यासाठी पुढे सरसावली असता मगरीने तिच्यावरच हल्ला केला आणि ठार केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 फूट मगरीने सर्वात प्रथम श्वानावर हल्ला केला होता. पण जेव्हा महिलेने श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मगरीने महिलेवरच हल्ला केला. महिलेच्या प्रयत्नांमुळे श्वान वाचला, मात्र तिला आपला जीव गमवावा लागला. 


फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन कमिशननुसार (Florida Fish and Wildlife Conservation Commission) या ठिकाणी मगरीचे हल्ले होणं फार दुर्मिळ बाब आहे. FWC ने एका निवेदनात माहिती दिली आहे की "पीडित महिलेचा मृतदेह मिळवला आहे. तसंच ट्रॅपरने मगरीला पकडलं आहे". 


घटनेची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या श्वानासह फेरफटका मारत असताना मगर अचानक पाण्यातून बाहेर आली आणि हल्ला केला. मगर श्वानाला पाण्यात खेचून नेण्याचा प्रयत्न करत होती, पण महिलेने त्याला वाचवलं. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.