Fish Fossils Discovery:  नुकतेच मानवांबद्दल एक धक्कादायक संशोधन समोर आले आहे, ज्यानुसार माकडांपेक्षा माशांचे वय अधिक आहे. संशोधनात असे समोर आले आहे की, मानवांच्या जबड्याप्रमाणेच माशांचे जबडे असतात. (Amazing Facts Did you know If our ancestors werent monkeys a shocking revelation nz) म्हणजेच माशांची रचना मानवासारखीच असते. यात किती खरं आहे ते जाणून घेऊ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण चीन मध्ये शोध


हा मासा दक्षिण चीनमध्ये सापडला आहे. काही दिवसांपूर्वी चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्स, क्विझिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी यांनी मिळून एक संशोधन केले. या संशोधनातून शास्त्रज्ञांनी माशांच्या 5 प्रजाती शोधल्या आहेत. या माशांचे जीवाश्म 43.6 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.


आणखी वाचा - Online counseling ची झपाट्याने वाढतेय क्रेझ? जाणून घ्या नुकसान आणि फायदे


माशांची रचना माणसासारखी असते


संशोधनानुसार 400 दशलक्ष वर्षांहून अधिक जुन्या या माशांचे दात, पाठीचा कणा आणि जबड्याची रचना मानवासारखीच आहे. माशांचे हे अवशेष आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने अवशेष आहेत.


संशोधनाचे ठळक मुद्दे


संशोधनादरम्यान सापडलेल्या माशाचे नाव मिराबिलिस असे आहे. 20 मिराबिलिस माशांवर संशोधन करण्यात आले आहे. यातील सर्वात लहान माशाची लांबी 1.2 इंच आहे. जबड्याचा मासा सर्वात लहान आहे.


सुरुवातीला दात नव्हते


संशोधकांच्या मते, पूर्वी माशांमध्ये दात आढळत नव्हते. हळूहळू उत्क्रांती झाल्यामुळे माशांमध्ये दात विकसित झाले. शास्त्रज्ञांच्या मते, पहिला मासा 52 दशलक्ष वर्षांपूर्वी दिसला होता. विंचू हा माशांपेक्षा जुना प्राणी आहे.


आणखी वाचा - Maharashtra Bharti 2022 : सरकारी नोकरीचे स्वप्न आता होईल पूर्ण, करा या पदांसाठी अर्ज