Jeff Bezos on economic recession: अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. जगभरात आर्थिक मंदीचं (economic recession) सावट अनेक देशांवर असतानाच Amazon चे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आणि निरीक्षणामुळे सर्वसामान्यांच्याही नजरा वळल्या आहेत. किंबहुना खिशातील पैशांवर होत असणारा परिणाम पाहून आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होत आहे. (Amazon Founder Jeff Bezos on economic recession in the world)


काय म्हणाले Jeff Bezos ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीदरम्यान बेजोस यांनी सर्वसामान्यांना अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. ज्यामध्ये त्यांनी (how to save money?) पैसे जपून वापरण्याचा आणि अवाजवी वस्तू न घेण्याचा इशारा सर्वांनाच दिला. अमेरिकेतील (America) नागरिकांनासुद्धा त्यांनी कार आणि टीव्ही खरेदी न करण्याचा सल्ला दिला. मोठाले TV सेट खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर काही काळ तो निर्णय थोपवून धरा. पैसे वाचवा असंच ते वारंवार म्हणताना दिसले. 


खिशातला प्रत्येक रुपया तितकाच महत्त्वाचा 


बेजोस यांच्या म्हणण्यानुसार फक्त कार- टीव्हीच नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी हा नियम लागू होतो. त्यांचं एकंदर वक्तव्य पाहता हा रोख सर्वसामान्यांकडेही असल्याचं स्र।ष्ट होतं. सध्या अर्थव्यवस्था (Economy) सुस्थितीत नाही, असं म्हणताना अनेक क्षेत्रांमध्ये सुरु असणाऱ्या कर्मचारी कपातीवर प्रकाश टाकला. 


वाचा : Donald Trump : ट्रम्प यांचे Twitter अकाउंट 22 महिन्यांनंतर रिस्टोअर, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया


Amazon मध्येही Layoff 


सद्यस्थितीला अर्थव्यवस्था सुरळीत सुरु नसल्यामुळे गेल्या काही काळापासून बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी संख्येत लक्षणीय प्रमाणात घट केली. बेजोस यांच्या Amazon मध्येही हेच चित्र पाहायला मिळालं होतं. ट्विटर, मेटा आणि अन्स IT Companies मध्येसुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागलं होतं. 


बेजोस यांच्या वक्तव्यातून तुम्ही कसे सतर्क व्हाल? 


अर्थव्यवस्थेचं एकंदर निरीक्षण करुन बेजोस यांनी केलेलं वक्तव्य पाहता सर्वसामान्यांनीही नव्या आणि जास्त किमतीच्या वस्तू खरेदी करण्याआधी विचार करावा. खात्यात असणाऱ्या ठेवी (Savings) कशा वाढवता येतील यावर भर द्यावा. जेणेकरून आर्थिक मंदीच्या झळा पोहोचल्या तरीही त्याचा मोठा फटका तुम्हाला बसणार नाही. त्यामुळं काहीही खरेदी करण्यापूर्वी, विचार करा!