बगदाद : अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला चढवला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला चढवत इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने हा हल्ला बगदादच्या महत्वाच्या शहरावर केला आहे. या हल्यामध्ये मारले गेलेले हे इराण समर्थक मिलिशिया हश्द अल-शाबी असल्याचे सांगितले जात आहे. हश्द अल-शाबी ईराण समर्थक हे प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. 


इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल (IRGC) कासीम सुलेमानी इराकची राजधानी बगदाद येथे मारले गेले. कासीम सुलेमानी यांचा ताफा बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठजण ठार झाले. 



हादेश अल शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहली अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने इराणचे टॉप कमांडर मेजर कासेम सुलेमानी यांना ठार केलं आहे. 


महत्त्वाचं म्हणजे, कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला.