वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या अलास्काच्या आखातामध्ये आज शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला. 8 पूर्णांक 2 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता. ग्रिनविच प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या भूकंपाचं केंद्र अलास्कामधल्या कोडिअॅक शहरापासून 280 किलोमीटरवर होतं. 


कॅनडाच्या किनारपट्टीवर सुनामीचा इशारा


भूकंपानंतर अलास्कासह कॅलिफोर्निया, ओरिऑन, वॉशिंग्टन ही अमेरिकन राज्यं आणि कॅनडाच्या किनारपट्टीवर सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याची सूचना करण्यात आली.