भारतीय लष्कराला मॉर्डन बनवणार अमेरिका
अमेरिका भारतीय लष्काराला अत्याधुनिक बनवण्यासाठी मदत करणार आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारतीय लष्कराच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करणार आहेत. अमेरिकेच्या एका कमांडरने असं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : अमेरिका भारतीय लष्काराला अत्याधुनिक बनवण्यासाठी मदत करणार आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारतीय लष्कराच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करणार आहेत. अमेरिकेच्या एका कमांडरने असं म्हटलं आहे.
मागील एक दशकापासून भारत आणि अमेरिका यांच्यात सुरक्षेच्या बाबतीत देवाण-घेवाण सुरु आहे. जवळपास १५ अरब डॉलरचा व्यवहार दोघांमध्ये होतो. येणाऱ्या काळात आणखी व्यवहार वाढण्याची शक्यता आहे. भारत अमेरिकेकडून आणखी काही नवीन मिलिटरी हार्डवेयर खरेदी करणार आहे. ज्यामध्ये फायटर जेट्स, लेटेस्ट अनमॅन्ड वीइकल आणि एयरक्राफ्ट कॅरियर्स देखील आहे.
यूएस पॅसिफिक कमांडचे कमांडर ऐडमिरल हॅरी हॅरिस यांनी म्हटलं आहे की, अमेरिका भारतीय लष्कराला मदत करण्यासाठी तयार आहे. भारत अमेरिकेचा एक मोठा पार्टनर आहे. हे रणनैतिक संबंध भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहेत. आम्ही भारताला त्याच जागेवर ठेवतो जेथे आमचे इतर सहयोगी देश आहेत.