डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून निर्दोष मुक्तता
निवडणूक होत असलेल्या या वर्षात ट्रम्प यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेन सिनेटनं बुधवारी दिलासा दिला. ट्रम्प यांची महाभियोगातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सत्तेचा गैरवापर आणि काँग्रेसच्या अधिकारांची पायमल्ली हे आरोप ट्रम्प यांच्यावर लावण्यात आले होते.
निवडणूक होत असलेल्या या वर्षात ट्रम्प यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा आहे. सत्तेचा गैरवापर या आरोपाबाबत मतदान घेतलं असता ५२ विरूद्ध ४८ मतं ट्रम्प यांच्या बाजूने पडली तर काँग्रेसच्या अधिकारांची पायमल्ली या आरोपासाठी ५३ विरूद्ध ४७ मतं पडली.
महाभियोग म्हणजे काय?
कायदे मंडळामार्फत एखाद्या घटनात्मक पदावरील व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठीच्या प्रक्रियेला महाभियोग असं म्हणतात.
अमेरिकेत महाभियोग चालला की व्यक्तीला पदावरुन बाजूला व्हावेच लागते असे नाही.
ट्रम्प यांच्या बाबतीत त्यांनाही पदावरून बाजूला व्हावे लागेल असे दिसत नाही.
कारण सीनेट म्हणजे जिथे महाभियोग चालणार आहे तिथे ट्रम्प यांच्या पक्षाला बहुमत आहे.