नवी दिल्ली : खोटं बोलणं पाप आहे पण राजकारण्यांना सर्व माफ आहे असं मिश्किमध्ये म्हटलं जातं. कारण अनेक राजकारणी आपलं म्हणणं जनतेला पटवून देण्यासाठी खोट बोलतात पण रेटून बोलतात. त्यांचा बोलण्याचा अविर्भाव असा असतो की मी सांगतोय तेच अंतिम सत्य आहे. पण कालांतराने यामागचं खर सत्य लोकांना कळतच जातं. अमेरिकेचे दैनिक वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या कार्यकाळातील 700 दिवसांमध्ये 7 हजारहून जास्त वेळा खोट बोलले आहेत किंवा लोकांना चुकीची माहिती दिली आहे. वॉशिंग्टन पोस्टने सलग याची नोंद ठेवत मोजणी केली आहे.


दीड डझन मुद्द्यांसाठी 7,546 खोट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात खोट्यावर खोट बोलल जात असा आरोप केला जातोय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दीड डझन मुद्दे पटवून देताना 700 दिवसांत 7 हजारहून जास्तवेळ म्हणजेच 7 हजार खोट बोलले आहेत. अर्थकारण, रोजगार, विदेश नीती, टॅक्स व्यवस्था, गुन्हे, दहशतवाद, शिक्षण, व्यापार, रुसशी संबध अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणात त्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचे म्हटले गेले आहे.


तसेच या दैनिकाने ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या खोट्या विधानांची मोजणी देखील केली आहे. हे सर्व विश्लेषण पाहिले तर क्वचितच असा मुद्दा सापडेल ज्यात त्यांनी सर्व खरी माहिती दिली असावी असंही म्हटलं जात आहे.   


2017 पासून प्रत्येक महिन्यात ट्रम्प यांच्या खोट्या विधानांची संख्या वाढतच आहे. राष्ट्राध्यक्षांच्या अशा खोट्या वक्तव्यावर त्यांचे समर्थक विश्वास देखील ठेवतात असेही वॉशिंग्टन पोस्टच्या दुसऱ्या लेखात म्हटलं गेलंय. ट्रम्प यांच्या खोट्या विधानावर या दैनिकांने सर्व्हे देखील केला आहे.