वॉशिंग्टन : कोरोनाचा सामना करण्याला भारताला मदतीसाठी अमेरिका पुन्हा एकदा पुढे आले आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या की, 'भारतात कोरोना संसर्गाची वाढ अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी या साथीमुळे आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करते. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत हॅरिस म्हणाल्या की, कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी आम्ही ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कंसंट्रेटर, N-95 मास्क आणि रेमेडासिव्हिर इंजेक्शन्स भारतात पाठवत आहोत. आम्ही भारतात साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी आणखी मदत पाठविण्यासाठी तयार आहोत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर कमला हॅरिस म्हणाल्या की, 'भारत आणि इतर देशांनी आपल्या लोकांना लवकरात लवकर लसी देण्यास मदत करण्यासाठी आम्ही कोरोना लसीवरील पेटंट निलंबित करण्यासाठी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. जगभरात भारत आणि अमेरिकेत कोविडची संख्या सर्वाधिक आहे.'


कमला हॅरिस म्हणाल्या की, 'सोमवारी 26 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मदत पाठवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेने शुक्रवारी 30 एप्रिल रोजी भारताला मदत साहित्य पुरवले. हॅरिस म्हणाल्या की, कोरोना साथीच्या सुरूवातीला जेव्हा आमच्या रूग्णालयाचे बेड वाढविण्यात आले तेव्हा भारताने मदत पाठविली होती. आज आम्ही भारताला त्याच्या आवश्यक वेळी मदत करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही भारताला आशियाई क्वाडचे सदस्य म्हणून आणि जागतिक समुदायाचा एक भाग आणि मित्र म्हणून पहात आहोत.'