पुढच्या ४८ तासात पाकिस्तानचा फैसला करणार अमेरिका
अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी 1,626 कोटी रुपयांची पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखल्याचं स्पष्ट केलं आहे. काही तासांनंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये आम्ही आपल्याला या प्रकरणामध्ये आणखी काही प्रमुख अपडेट देऊ.
नवी दिल्ली : अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी 1,626 कोटी रुपयांची पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखल्याचं स्पष्ट केलं आहे. काही तासांनंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये आम्ही आपल्याला या प्रकरणामध्ये आणखी काही प्रमुख अपडेट देऊ.
1 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, 'पाकिस्तान 15 वर्षांपासू 33 बिलियन डॉलर्स (भारतीय चलनानुसार 2.14 लाख कोटी) घेऊनही अमेरिकेला मुर्ख बनवत आहे.'
संयुक्त राष्ट्रामध्ये निकी हेली यांनी दिलेला निवेदनानंतर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सेंडर्स यांनी मिडियाला सांगितले की, आम्हाला माहित आहे की पाकिस्तान दहशतवादा विरोधात बरेच काही करू शकतो. आमची इच्छा आहे की, त्यांनी समोर यावं आणि करुन दाखवावं.
सेंडर्स म्हणाल्या की, "पहिली गोष्ट अशी की पाकिस्तानच्या प्रश्नी आमची इच्छा आहे की त्यांनी दहशतवाद रोखण्यासाठी अधिक पावले उचलण्याची गरज आहे. त्यांनी हे काम करावे. अजून काही महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलण्याचं झालं तर आम्ही तुम्हाला 24 ते ४८ तासात महत्त्वाचे अपडेट देऊ.
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते हिदर न्यूरेट यांनी सांगितले की, 'पाकिस्तान आमचा प्रमुख सहकारी आहे. त्या क्षेत्रात आमच्या काय समस्या आहे? पाकिस्तानला याबद्दल माहिती आहे. त्याने काय करावे हे देखील त्याला ठाऊक आहे. ऑगस्टमध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांनी दक्षिण आशिया धोरणाविषयी त्यांची भूमिका सांगितली आहे. दहशतवाद्यांना आपल्या भूमीतून प्रसार करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करावीच लागेल.'
हिदर पुढे म्हणाले की, 'आम्ही त्यांना आधीही निधी दिला आहे. आता आणखी मदत मिळविण्यासाठी, त्यांना हे सिद्ध करावे लागेल की ते दहशतवादाविरोधात सुधारक कारवाई करीत आहेत. सचिव टिलरसन आणि सचिव मॅटिसे यांनी त्यांना याबाबत समजावले आहे.'