अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात अनेक गोष्टी या अधोरेखित करण्याजोग्या ठरत आहेत. अतिशय उत्साही वातावरणातील स्वागत आणि मोटेरा स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या दौऱ्यातील पुढच्या टप्प्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या या प्रवासात रस्त्याच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी ट्रम्प यांच्या वापरात असणारी आलिशान गाडीही सर्वांचं लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रस्त्याने प्रवास करण्यासाठीची ती त्यांची अधिकृत गाडी आहे. ट्रम्प ज्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर असतात तेथे ही कार ते सोबत नेतात. या गाडीचं नाव आहे द बीस्ट. ही कार पहिल्यांदा वापरण्यात आली २४ सप्टेंबर २०१८ रोजी. तेव्हापासून ट्रम्प या गाडीने प्रवास करतात. अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या संरक्षणासाठी या कारमध्ये डझनभर गोष्टी आहेत.


ट्रम्प भारतात येण्यापूर्वीच त्यांची ही आलिशान कार येथे पोहोचली होती. या कारची आणखी सर्वात महत्वाची खासियत काय आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


या कारच्या मॉडेलचं नाव आहे - लिमोजिन
कंपनी - कॅडीलॅक , जनरल मोटर्स
किंमत - १०.७ कोटी रूपये


या कारची बॉडी ८ इंचांची जाडीची आहे. मिलिट्री ग्रेड आर्मरची आहे.
बोईंग विमान ७५७ जेटच्या केबिनचे गेट जेवढं जड असतं तेवढे या कारचे दरवाजे वजनदार आहेत.


कारच्या खिडकीत ५ लेअर असतात. काच आणि पॉलीकार्बोनेटच्या या लेअर असतात.
दबीस्ट या गाडीच्या खिडक्या बुलेट प्रुफ असतात.


ट्रम्प यांच्या द बीस्ट गाडीच्या मागील भागात एक कम्पार्टमेंट आहे. यात बसतात राष्ट्रपती ट्रम्प. 
यात काचेचं पार्टिशीयन असतं. ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये असणारं पार्टिशन वेगळं करण्यासाचं स्वीच फक्त ट्रम्प यांच्याकडे असतं.


ट्रम्प यांच्या सीटजवळ एक सॅटेलाईट फोन लावलेला असतो, हा फोन जोडलेला असतो थेट अमेरिकन उपराष्ट्रपती यांना आणि अमेरिकन रक्षा विभाग पेंटागेनला.


या कारमध्ये हत्यारं देखील असतात. अत्याधुनिक शॉटगन, अश्रुधुरांचे गोळे हे सर्व यात असतं.


कारच्या पुढे हेडलाईटच्या खाली टिअर गॅस ग्रेनेड लॉन्चर देखील असतो.


कारमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या ब्लडग्रुपचं रक्त देखील नेहमी सुरक्षित ठेवण्यात येतं.


एमर्जन्सीत कारमध्ये ऑक्सिजन सप्लायची देखील व्यवस्था असते.


कधी एखादा केमिकल हल्ला झाला, तर या हल्ल्याचा परिणाम कारमध्ये बसलेल्या लोकांवर होत नाही.


या कारमध्ये फक्त ड्रायव्हरची खिडकी उघडू शकते ती देखील फक्त ३ इंच.


या कारचे टायर पंक्चर होत नाहीत, आणि बॉम्ब हल्ल्याचा देखील या कारवर कोणताही परिणाम होत नाही.


द बीस्ट या ट्रम्प यांच्या कारमध्ये पुढच्या बाजूला कॅमेरे लागलेले असतात, जे रात्रीच्या अंधारातही स्पष्ट पाहू शकतात.


या गाडीत स्टीलची रिम लागलेली आहे, कोणत्याही कारणाने कारचं नुकसान झालं तरी कार चालू शकते.


सर्वात शेवटी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, या गाडीच्या ड्रायव्हरला यूएस सिक्रेट सर्व्हिसकडून ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत देखील या गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवू शकतो.


हल्ल्याच्या स्थितीतही गाडी सुरक्षित पुढे काढण्याचं ट्रेनिंग त्याला दिलं जातं.


अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा या कारसोबतच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सेवेत एअरफोर्स वनचं एक या विमानही आहे. हे विमान म्हणजे चालतं फिरतं, आणि उडतं व्हाईट हाऊसच आहे. यावर एक हॉलीवूडमध्ये सिनेमा देखील तयार करण्यात आला आहे. अण्वस्त्र हल्ला देखील हे विमान सहन करू शकतं.


द बीस्ट कार, एअरफोर्स वन यानंतर एक हेलिकॉप्टर देखील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सेवेत आहे. या हेलिकॉप्टरचं नाव आहे मरिन वन. ऑस्प्री एमबी २२.