Alaska Airlines pilot : उंच आकाशात उड्डाण घेत असलेल्या विमानात एक अत्यंत थरारक घटना घडली आहे.  ऑफ ड्युटी पायलटनं विमानाच्या कॅबिनमध्ये घुसून इंजिन बंद केलं यामुळे विमानात खळबड उडाली. 83 प्रवासी या विमानातून प्रवास  करत होते. अलास्का एयरलाइन्सच्या विमानात हा विचित्र प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Horizon Air Embraer E-175 Everett या फ्लाईटमध्ये हा थरारक प्रकार घडला. हे विमान वॉशिंग्टन येथून सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियाला जात होते. एकूण 83 प्रवासी या विमानातून प्रवास  करत होते. यावेळी ऑफ ड्युटी पायलटनं विमानाच्या कॅबिनमध्ये घुसून इंजिन बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, को पालयटच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. पोर्टलँड येथे या विमानाचे इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. यानंतर ऑफ ड्युटी पायलटला तात्काळ अटक करण्यात आली. 


नेमकं काय घडलं?


जोसेफ इमर्सन (44) असे अटक झालेल्या ऑफ ड्युटी पायलटचे नाव आहे. जोसेफ इमर्सन हा  Horizon Air Embraer E-175 Everett या फ्लाईटनेच प्रवास करत होता. विमान उंच आकाशात उड्डाण घेत असताना  जोसेफ थेट विमानाच्या कॅबिनमध्ये घुसला आणि त्याने विमानाचे इंजिन बंद केले. होरायझन कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरने तात्काळ कंट्रोल रुमशी साधून इमर्जन्सी ब्रेक डाऊन करत असल्याची सूचना दिली. यानंतर क्रू मेंबरने पोर्टलँड येथे या विमानाचे इमर्जन्सी लँडिग केले. येथेच जोसेफ इमर्सन याला तात्काळ अटक करण्यात आली. 


ऑफ ड्युटी पायलटनं 83 प्रवाशांचा जीव धोक्यात घातला


जोसेफ इमर्सन आपल्या या विचित्र कृतीने 83 रवाशांचा जीव धोक्यात घातला होता. इंजिन बंद झाल्यामुळे विमान जमीनीवर कोसळले असते. मात्र, होरायझन कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विमानाचे इमर्जन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेतला. पोर्टलँड येथे या विमानाचे इमर्जन्सी लँडिग केल्यानंतर जोसेफ इमर्सन याला अटक करुन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान जोसेफ इमर्सन याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय. डिप्रेशन, एंग्जाइटी, एक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर यासारख्या समस्यांनी तो त्रस्त आहे. यातूनच त्याने ब्रेकडाऊन सारखे कृत्य केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.