लाईव्ह न्यूज वाचताना अँकरला आला ब्रेन स्ट्रोक, पुढे काय झालं पाहा Video
चालता फिरता अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन होत असल्याच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे अशा बातम्या ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो. ब्रेन स्ट्रोकचं असंच काहीसं असून जीवघेणं ठरू शकतं.
News Anchor Brain Strok In Live Bulletin: रोजच्या धकाधकीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कामाच्या तणावामुळे हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह आणि विविध आजारांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसात तर हृदयविकाराचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. चालता फिरता अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन होत असल्याच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे अशा बातम्या ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो. ब्रेन स्ट्रोकचं असंच काहीसं असून जीवघेणं ठरू शकतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका न्यूज अँकरला लाईव्ह शोमध्ये ब्रेन स्ट्रोक (Brain Strok) आला आणि न्यूजरुममध्ये एकच धावपळ उडाली. पण अँकरच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला असंच म्हणावं लागेल. तसेच बुलेटिनवर कोणताही परिणाम झाला नाही हे विशेष..
अमेरिका न्यूज चॅनेल 2 NEWS च्या महिला अँकर जूली चीनला बातम्या वाचत होती. तेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर तिने तात्काळ स्वत:ला सावरत डॉक्टरांना कॉल केला. तिच्या प्रसंगावधानामुले आज तिची तब्येत ठणठणीत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला अँकर जूली चिन बातम्या वाचताना दिसत आहे.
बातम्या वाचताना जूली चिन एक लाईन वाचते आणि तिच्या आवाजात तणाव जाणवू लागतो. यावेळी ती बातम्या वाचण्याचा वारंवार प्रयत्न करते. पण तिचा आवाजात गडबड दिसून येते. तेव्हा तिला आपल्याला काहीतरी विचित्र होत असल्याची जाणीव होते. ती लगेचच प्रेक्षकांची माफी मागून बुलेटिन हवामान सेक्शनकडे ट्रान्सफर करत आणि डॉक्टरांसी कॉन्टेक्ट करते.
'मला क्षमा करा, मला सकाळपासून अस्वस्थ वाटत आहे. मी माझ्या सहकाऱ्याकडे बुलेटीन देण्यापूर्वी तुमची माफी मागते.' यानंतर न्यूजरुममधील कर्मचाऱ्यांना तिला वैद्यकीय गरज असल्याचं कळतं. इतर कर्मचारी तात्काळ 911 वर कॉल करून डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिला स्ट्रोक आल्याचं सांगितलं.