फ्लोरिडा : मिस युनिव्हर्स ( Miss Universe) स्पर्धेतील विजेती घोषित करण्यात आली आहे. मेक्सिकोच्या  (Mexico) अँड्रिया मेझा (Andrea Meza)हिची  मिस युनिव्हर्स 2020 साठी (Miss Universe 2020) निवड झाली आहे. फ्लोरिडामधील सेमिनोल हार्ड रॉक हॉटेलमध्ये 69वा मिस युनिव्हर्स सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी माजी मिस युनिव्हर्स  जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने अँड्रियाला जागतिक सौंदर्याचा मुकुट परिधाण केला. हा किताब मिळवणारी अँड्रिया ही मेक्सिकोमधील तिसरी महिला ठरली आहे.


अँड्रिया ही सॉफ्टवेअर इंजिनिअर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाइट WION मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिस युनिव्हर्स अँड्रिया मेझा एक मॉडेल तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. लैंगिक असमानता आणि लैंगिक हिंसा यासारख्या विषयांवर नेहमी बोलत असते. अँड्रियाचा जन्म चिहुआहुआ ( Chihuahua City) शहरात झाला आहे. तिला दोन बहिणी आहेत. तिने 2017 मध्ये Chihuahua विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे.



ब्राझीलची ज्युलिया गामा आणि मिस मेक्सिको अँड्रिया या स्पर्धेतील अंतिम दोन स्पर्धक होत्या. त्याच वेळी, पेरुची जॅनिक मॅसेटा (Janick Maceta) ही उपविजेती ठरली. आणि भारताकडून प्रमुख दावेदार समजली जाणारी 22 व्या वर्षी अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो (Adeline Castelino) अव्वल 5 मध्ये आली. तिच्या विजयानंतर अँड्रिया मेझा म्हणाली की, आजच्या काळात सौंदर्य म्हणजे फक्त दिसणे हा आहे. मात्र, माझ्यासाठी सुंदर असणे म्हणजे मनापासून सुंदर असणे होय.


या उत्तराने मिळाला विजय


अंतिम फेरीत, अँड्रियाला विचारले गेले की, जर आपण देशातील प्रमुख लिडर  असती तर कोरोना विषाणूच्या साथीचा कसा सामना केला असता? त्याला उत्तर म्हणून अँड्रिया म्हणाली, 'माझा असा विश्वास आहे की अशी कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य मार्ग नाही. तथापि, परिस्थिती बिघडण्यापूर्वी मी लॉकडाऊन लावला असता. मी लोकांचे जीवन असे बिघडताना पाहू शकले नसते. म्हणूनच मी सुरुवातीपासूनच परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता '. अँड्रियाचे हे उत्तर जुरींना आवडले.