मुंबई : भारतात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक देश भारतातील ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सिंगापूर देखील भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आज सिंगापूरहून 256 ऑक्सिजन सिलिंडर भारतात दाखल झाले आहेत. सिंगापूर एअर फोर्सच्या दोन विमानांनी ते भारतात आणले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूरचे मंत्री मलिकी उस्मान यांनी सिंगापूर हवाई दलाच्या सी-130 ला हिरवा झेंडा दाखवत हे ऑक्सीजन सिलेंडर भारतात पाठवले. ज्यामध्ये 256 ऑक्सीजन सिलेंडरचा समावेश आहे.


कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने भारतात कहर केला आहे. ऑक्सिजनच्या तीव्र टंचाईमुळे आता सैन्य देखील मदतीसाठी आलं आहे. भारतीय हवाई दलाच्या मालवाहू वाहक सी- 17 विमानाने दुबईहून क्रायोजेनिक ऑक्सिजन सिलिंडर कंटेनर भारतात आणले आहेत.



ऑक्सिजनच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या मध्य प्रदेशासाठी दिलासा मिळाल्याची एक मोठी बातमी आहे. पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस बोकारो पासून सहा टँकरमध्ये 63.78 टन ऑक्सिजन घेऊन निघाली आहे. दोन लिक्विड ऑक्सिजन टँकर जबलपूर आणि 4 भोपाळ येथे जातील. यासाठी भारतीय रेल्वेने ग्रीन कॉरिडॉरसाठी विशेष व्यवस्था केली आहे. भोपाळ रेल्वे विभागाने मंडीदीप येथे या टँकरच्या लँडिंगची व्यवस्था केली आहे. हे टँकर रिक्त झाल्यानंतरच रेल्वेमार्गानेच लोड करण्यासाठी जातील.