लंडन : ब्रिटनचे (Britain) आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी बुधवारी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत (south africa) समोर आलेल्या नवीन कोविड -१९च्या विषाणूचे (New Coronavirus) दोन प्रकार ब्रिटनमध्येही मिळाले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा (Corona virus) जसा हा प्रकार आढळला आहे तसाच दक्षिण आफ्रिकेतही वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू (coronavirus strain) सापडले आहेत. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की व्हायरसच्या नवीन प्रकारामुळे या देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची आणखी एका लाटेचा सामना करावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅट हॅन्कॉक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, नवीन समोर आलेल्या दोन प्रकारच्या कोरोना विषाणूबाबत माहिती घेतली असता काही आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करुन परत आलेल्या काही लोकांशी संपर्क आला. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार हा अतिशय चिंताजनक आहे. कारण हा नवा कोरोनाचा विषाणू अधिक वेगाने संसर्ग पसरवितो. तसेच असे दिसते आहे की, ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन प्रकारच्या विषाणूत काही बदलही झालेला पाहायला मिळत आहे. 


दक्षिण आफ्रिका प्रवास करण्यास बंदी


ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील लोक किंवा गेल्या पंधरवड्यात त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांनी त्वरित क्वारंटाईन व्हावे. ब्रिटनचे वैज्ञानिक दक्षिण पूर्व इंग्लंडमधील एका प्रयोगशाळेत विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत संशोधन सुरु करत आहेत.


नवीन विषाणूचे ३६,८०४ बाधित 


कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारामुळे ब्रिटनच्या अनेक ठिकाणी बंदीचा सामना करावा लागलत आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी संसर्गाचे ३६,८०४ बाधित सापडले आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतके बाधित समोर आले आहेत.


नवीन कोरोना विषाणूचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. पूर्व आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ख्रिसमसनंतर २६ डिसेंबरपासून चार श्रेणीवर बंदी घातली जाणार आहे. संसर्ग रोखण्यासाठी सुधारित नियमांनुसार, एक ते तीन श्रेणीतील क्षेत्रात राहणारे लोक ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना भेटू शकतात. वर्ग चार क्षेत्रात राहणारे लोक घरातील सदस्यांसह ख्रिसमस साजरा करण्यास सक्षम असतील.


आणखी तिसरा नवा प्रकार 


ब्रिटनमध्ये सापडला कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार, गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाचे नवे दोन प्रकार समोर, नवा व्हायरस दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं झाल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी तिसरा नवा प्रकार सापडला आहे. त्याचा उगम दक्षिण अफ्रिकेत झाल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. हा नवा प्रकार नुकत्याच सापडलेल्या कोरोनापेक्षाही वेगाने पसरणारा आहे. त्यामुळे आता दक्षिण अफ्रिकेतून गेल्या पंधरा दिवसात इंग्लंडमध्ये आलेल्यांच्या तपासण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाणार आहे. ब्रिटनने शिवाय दक्षिण अफ्रिकेकरिता सुरु असलेली विमान सेवा तात्काळ थांबवली आहे.