वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षातल्या सर्वात भीषण ठरलेल्या इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक भीषण चक्रीवादळ येऊन धडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताशी २०० किमी वेगानं वाहणारं मरिया नावाचं चक्रीवादळ कॅरेबियन बेटांवर येत्या काही तासात आदळणार आहे.  या महिन्यातलं अमेरिकन पूर्व किनाऱ्यावर आदळणारं हे दुसरं चक्रीवादळ आहे. अमेरिकेच्या हवामान विभागानं वादळ अतिभीषण दर्जाचं असल्याचं म्हटलंय. त्यामुळे मोठ्याप्रमाणात जीविताला धोका निर्माण झाला आहे.


अमेरिकेचं तटरक्षक दल आणि इतर यंत्रणा वादळाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज होत आहे. अनेक बेटांवरून गेल्या आठवड्यातच मोठ्याप्रमाणात नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.