बर्लिन: जगाला ग्लोबल वार्मिंगमुळे (Global Warming) होणारे नुकसान आता अशा पातळीवर पोहोचले आहे, जे पुन्हा पूर्ववत करता येणार नाही. म्हणजेच आता या बदलासह आणि तोट्यासह सोबत जगायचे आहे, असे वैज्ञानिक प्राध्यापक मार्क्स रेक्स (Professor Marcus Rex) यांचे म्हणणे आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्क्टिक मोहिमेचे (Arctic expedition) आयोजन प्राध्यापक मार्कस रेक्स यांनी केले आहे.


समुद्रातील गर्मीने बर्फ वितळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राध्यापक मार्क्स रेक्स म्हणतात, 'आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे हे ग्लोबल वार्मिंगचे मोठे नुकसान आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल. प्राध्यापक रेक्स यांनी उत्तर ध्रुवावरील (North Pole) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. यात 20 देशांतील 300 वैज्ञानिक या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. हा प्रवास 389 दिवस चालला आणि गेल्या ऑक्टोबरमध्ये ते जर्मनीला परतले.


प्रवासात 10 अब्ज रुपये खर्च केले


वैज्ञानिकांना उत्तर ध्रुवाच्या (North Pole) मोहिमेत धक्कादायक माहिती आणि पुरावे मिळाले. या पुराव्यावरुन असे स्पष्ट होत आहे की, काही दशकांत अंटार्क्टिकामधील हिमनग पूर्ण विरघळतील आणि आर्क्टिक महासागरातील बर्फ गायब होईल. या पथकाने शोधाशी संबंधित 150 टेराबाइट डेटा आणि बर्फाचे एक हजाराहून अधिक नमुने देखील सोबत आणले आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे नुकसान शोधण्यासाठी या शोध मोहिमेवर 140 मिलियन यूरो (165 दशलक्ष डॉलर्स किंवा 10 अरब अधिक रुपये) खर्च झाले आहेत.


2020 मध्ये सर्वात मोठे नुकसान


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आर्कटिक महासागरातील बर्फात 2020च्या वसंत ऋतूमध्ये सर्वाधिक घट झाली. म्हणजेच उन्हाळ्यात समुद्र बर्फ कमी होण्याची नोंद झाली आहे. या नोंदीनुसार 2020 मध्ये अधिक समुद्रातील बर्फ कमी झाला आहे. या उन्हाळ्यात आर्कटिक समुद्रातील बर्फ मागील दशकांपेक्षा अर्धा झाला आहे, असे रेक्स यांनी म्हटले आहे.