मुंबई : शीख समुदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहेब येथे जाण्य़ासाठी भारतातीतल विशेषत: भारतीय शीखांना फक्त अधिकृत, वैध ओळखपत्र गरजेचं असणार आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. शिवाय येथे येण्यासाठी पूर्व नोंदणी गरजेची नसल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. पण, आता मात्र करतारपूर कॉरि़डोरचा वापर करत पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असणाऱ्या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी भारतीयांना पारपत्र म्हणजेच पासपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी सैन्यदल प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी इस्लामाबाद येथे माध्यमांशी संवाद साधतना ही अट समोर ठेवल्याचं कळत आहे. 'सुरक्षेचे निकष पाहता कायदेशीररित्या पासपोर्टची ओळख पटल्यांनंतरच भाविकांना त्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही', असं गफूर Hum Newsशी संवाद साधताना म्हणाले. 




गुरुनानक देव यांच्या ५५०व्या जयंतीपूर्वी शनिवारी करतारपूर कॉरिडोर सुरु करण्यात येणार आहे. मुळ स्वरुपात गुरुद्वारा दरबार साहेब येथे भारतीय शीख हे व्हिसाशिवायही जाऊ शकतात. असं म्हटलं जातं की गुरुनानक यांनी त्यांच्या जीवनातील अखेरच्या १८ वर्षांचा काळ येथेच व्यतीत केला होता. याच ठिकाणी त्यांचं देहावसान झालं होतं. ज्यामुळे शीख समुदायासाठी या स्थळाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे.