मुंबई : कोरोना व्हायरसचा उद्रेक होऊन आता एक महिना उलटला आहे. चीनबरोबरच आता इतर देशांना देखील या व्हायरसची झळ पोहोचत आहे. अर्थव्यवस्था, जनजीवन कोलमडल्यानंतर आता कुठे चीनचं आयुष्य पूर्वपदावर येत आहे. चीनमधील नागरिक जगण्याचा प्रयत्न करत आहे.  सोमवारी बिजींग आणि चीनच्या अनेक ठिकाणची दुकानं सुरू करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'चायनिज फूडी' असलेल्या नागरिकांनी त्यांचे काही खास आऊलेट बंद ठेवले होते. आता काही गोष्टी सुरक्षित झाल्यावर हुनानमधील चांगसा येथील लोकप्रिय बबल टी स्टोर पुन्हा सुरू केलं आहे. येथील चहा प्रेमींनी लगेचच या बबल टीला भेट देण्यासाठी उत्सुकता दाखली. पण असं असलं तरीही त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. 



चीनमधील नागरिक कोरोना व्हायरसच्या भीतीने घराबाहेर पडत नव्हते. त्यांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून घराबाहेर पडण्यास मज्जावल करण्यात आला होता. आता या टी स्टॉलच्या निमित्ताने नागरिक पहिल्यांदा घराबाहेर पडले. पण अजूनही कोरोनाच्या भीतीने काळजी घेतली जात आहे.