मुंबई : नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी फिलिपिन्सला ASEAN मीट  साठी रवाना झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मोदींचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले. पण जगभराच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या सार्‍या नेत्यांना एकाच ड्रेसमध्ये बघून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण ही किमया अलबर्ट अंद्राद्रा यांनी जुळवून आणली आहे. 


१२ नोव्हेंबरला जगभरातील अनेक नेते एकत्र आले होते. यामागे औचित्य होते ते म्हणजे खास भोजनाचे. जगभरातील सारी मंडळी यावेळी एकत्र  जमले होते. या कार्यक्रमासाठी प्रख्यात डिझायनर अलबर्ट अंद्राद्रा यांनी सार्‍या पुरूष राष्ट्रपतींसाठी खास ड्रेस डिझाईन केले होते. 



 


पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सार्‍या नेत्यांनी बारोंग तागालोंग हा फिलिपिन्सचा राष्ट्रीय ड्रेस सार्‍यांनी घातला होता. यावेळेस फिलिपिन्सचे प्रसिद्ध खाद्य सुशी समवेत अनेक पदार्थांचे आयोजन करण्यात आले आहे. 


यंदा फिलिपिन्समध्ये ASEAN ची ३१ व्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  जापानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे पंतप्रधान दमित्रि मेदवेदेव आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजक सह अनेक मातब्बर नेते उपस्थित होते.