काबूल : अफगाणिस्तानचे  (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी  (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, गनी यांच्यासोबत त्यांच्या जवळचे लोक होते, जे काबूलवर तालिबानच्या (Taliban) ताब्यापूर्वी पळून गेले. सर्वजण रशियन विमानाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये  (UAE)  पळून गेले आहेत. राष्ट्रपती गनी हे देश सोडणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये आहेत. त्यांनी नोटांनी भरलेल्या पिशव्या आपल्यासोबत घेतल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी हा आरोप नाकारला आहे.


पत्नी आणि क्रिकेटर नबी यांचाही समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अफगाण इंटरनॅशनल'ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, तालिबानने सत्ता हाती घेण्याआधीच राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला आणि यूएईला गेले. राष्ट्रपतींची पत्नी रुला गनी, पूर्व अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि क्रिकेटपटू मोहम्मद नबी यांच्यासह त्यांचे 51 जवळचे मित्रही त्याच्यासोबत फरार झाले आहेत. हे सर्व रशियन विमानाने (Russian Aircraft) अफगाणिस्तानातून निघाले होते.



गनी यांच्यावर कारवाई करण्याची तयारी


काबूलमधील रशियन दूतावासाने नुकतेच कळवले की, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी चार कार आणि रोख हेलिकॉप्टर घेऊन पळून गेले आहेत. आधी ते ओमान आणि ताजिकिस्तानमध्ये राहतील असे सांगितले जात होते, पण आता ते सध्या यूएईमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, घनी यांच्यावर कारवाई करण्याची तयारीही सुरू झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तान दूतावासाने इंटरपोलला अशरफ गनी यांला ताब्यात घेण्यास सांगितले आहे.


देश सोडल्यावर राष्ट्रपतींनी पुन्हा स्पष्टीकरण दिले


'टोलो न्यूज'ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, दूतावासाने इंटरपोलला अश्रफ गनी, हमदल्लाह मोहिब आणि फजल महमूद फाजली यांना सार्वजनिक मालमत्ता चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून ते पैसे अफगाणिस्तानला परत करता येतील. दुसरीकडे, अशरफ गनी यांनी पुन्हा एकदा देश सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी पैसे घेऊन पळून जाण्याचे आरोप फेटाळून लावले आहेत, असे म्हटले आहे की जर ते पळून गेले नसते तर देशात आणखी रक्तपात होऊ शकतो.