सापडलं पृथ्वीच्या सर्वात जवळचं BlackHole! पृथ्वीपासून फक्त एवढे प्रकाशवर्ष आहे दूर...
Closest BlackHole : संशोधकांच्या माहितीनुसार या ब्लॅकहोलचं पोट रिकामं आहे. या ब्लॅकहोलला अंतरिक्षातील गुरुत्वीय लहरींचा शोध आहे ज्यामुळे या कृष्णविवराचे पोट भरू शकेल. हे कृष्णविवर तितकं शक्तिशाली नाही. आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटी थेअरीनुसार ब्लॅकहोलमधून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, म्हणूनच ब्लॅकहोल्सना या ब्रह्माण्डातील सर्वात हिंसात्मक प्रक्रिया बोललं जातं. कृष्णविवरं धूळ, तारे, गॅस काहीही गिळंकृत करू शकतात. ब्लॅकहोल्सच्या पोटात गोष्टी गेल्यास ते अधिक तेजस्वी आणि ताकदवान होतं.
Closest Black Hole Found : या अथांग विश्वात केवळ पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, की आपल्यासारखी जीवसृष्टी कोणत्या इतर ग्रहावर उपस्थित आहे, याबाबत माणूस कायम संशोधन करतोय. आपल्या पृथ्वीचा जन्म कसा झाला? आपल्या आसपासच्या ग्रहांवर, ताऱ्यांवर कशा प्रकारचं वातावरण आहे? आपल्या आसपास किती कृष्णविवरं म्हणजेच ब्लॅकहोल्स ( Blackholes around earth ) आहेत याबाबत माणसाला कायम कुतूहल राहिलंय. म्हणूनच जगभरात मोठ्या प्रमाणावर खगोलशास्त्रीय संशोधन सुरु आहे. याच संशोधनांमध्ये माणसाला एक मोठं यश मिळालं आहे. माणसाने पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेलं कृष्णविवर म्हणजेच ब्लॅकहोल शोधून काढलं आहे. हे ब्लॅकहोल पृथ्वीपासून केवळ 1600 प्रकाशवर्ष दूर आहे. हे कृष्णविवर आपल्या सूर्यापेक्षा 10 पट मोठं ( Blackhole 10 Times Bigger Than Our Sun) आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे ब्लॅकहोल त्याच्या ताऱ्यापासून तेवढ्याच अंतरावर आहे जेवढ्या अंतरावर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर आहे.
सर्वात जवळील BlackHole
वैज्ञानिकांच्या एका चमूने पृथ्वीच्या सर्वात जवळील ब्लॅकहोल शोधून काढलं आहे. ब्लॅकहोल एवढं मोठं आहे की त्यामध्ये आपल्या सूर्याएवढे 10 सूर्य सामावू शकतात. हे ब्लॅकहोल पृथ्वीपासून 1600 प्रकाशवर्ष दूर ( 1600 Light years) आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार हे ब्लॅकहोल ऑफियूचस नक्षत्रात (Ophiuchus Constellation) आहे. जेवढं सूर्य आणि पृथ्वीचं अंतर आहे, तेवढ्याच अंतरावर हे कृष्णविवर त्याच्या ताऱ्यापासून दूर आहे.
दुसरा नंबर कोणत्या ब्लॅकहोलचा?
सर्वात जवळील कृष्णविवर पृथ्वीच्या 1600 प्रकाशवर्ष जवळ आहे. यानंतर जे कृष्णविवर माणसाला ठाऊक आहे ते पृथ्वीपासून 3000 प्रकाशवर्ष दूर आहे. मानवाने आपल्या आकाशगंगेत (Milkyway) आतापर्यंत 20 कृष्णविवरं शोधली आहेत. ज्यामध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळील ब्लॅकहोल 1600 प्रकाशवर्षांवर आहे. ब्लॅकहोलमधील गुरुत्वीय शक्ती ( Gravitational Force) आसपासच्या सर्व गोष्टी गिळंकृत करते
शेवट कुठे हे अजूनही गूढ
मानवाला या विश्वातील अनेक गोष्टी ठाऊक नाही. माणसाला केवळ ब्लॅकहोलची सुरुवात कुठे होते हे ठाऊक आहे. मात्र अजूनही माणसाला ब्लॅकहोलचा शेवट सापडलेला नाही. संशोधकांच्या माहितीप्रमाणे प्रत्येक आकाशगंगेत एक ब्लॅकहोल आढळून येतं, मात्र हे ब्लॅकहोल तयार कसे होतात याबाबत अजूनही माणसाला माहिती समजू शकलेली नाही. म्हणूनच कृष्णविवरं ही अंतरिक्षात सर्वात रहस्यमयी गोष्ट ठरते. आपल्या आकाशगंगेत लाखो ब्लॅकहोल्स आहेत असा समज आहे.
कृष्णविवराचं नाव आहे Gaia BH1
उत्सर्जित होणाऱ्या एक्सरे लहरी ( X Rays) आणि गॅसेस किंवा उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशामुळे ब्लॅकहोलबाबत आपल्याला माहिती समजते. पृथ्वीच्या सर्वात जवळ असणारं कृष्णविवर तेवढं शक्तिशाली का नाही, याबाबत बोलताना हार्वर्ड स्मिथसोनीयन सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्सचे वैज्ञानिक डॉक्टर करीम अल बादरी म्हणतात की, "गेल्या चार वर्षांपासून आम्ही असे सुस्त किंवा तितक्या शक्तिशाली नसणारे ब्लॅकहोल्सच्या शोधात आहोत.याबाबतचा डेटा मिळवण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी GAIA स्पेसक्राफ्टची मदत घेतली जातेय. डॉक्टर कादरी पुढे म्हणतात की, हे कृष्णविवर आम्हाला नकळत आढळून आलं. पृथ्वीच्या मागच्या बाजूला एक चमकत तारा आहे. ज्यामध्ये प्रकाशाच्या विविध हालचाली पाहायला मिळत होत्या. या ताऱ्याच्या एकाबाजूला काहीतरी गुरुत्वीय बळ असल्याचं समजत होतं. म्हणूनच वैज्ञानिकांनी हवाईमधील जेमिनी नॉर्थ टेलिस्कोपची मदत घेतली. यानंतर आम्हाला हे कृष्णविवर आढळून आलं. या कृष्णविवराचं नाव Gaia BH1 ठेवण्यात आलेलं आहे.
astronomers found closest blackhole to earth named Gaia BH1