Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या देशांना भूकंपाचा (Earthquake) जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानात भूकंपाने 9 जणांचा मृत्यू झालाय. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 6.6 इतकी होती. दरम्यान, अफगाणिस्तानमध्येही दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानासह या भूकंपाचा धक्का भारतातही जाणवला. दिल्लीत काही ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेले लोक घरातून  बाहेर पळालेत. राजधानी दिल्ली आणि एनसीआर भूकापानं हादरले आहे. उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ही 6.6 रिश्टर स्केल एवढी होती. 


पाकिस्तान, अफगाणिस्तान हादरला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6.5 तीव्रतेच्या भूकंपाने मंगळवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा बराचसा भाग हादरला. घाबरलेल्या लोकांनी घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडण्यासाठी धावत सुटले होते.  ग्रामीण आणि दुर्गम खेड्यांमध्येही भूकंपाने लोक घाबरले होते. पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यातील 100 हून अधिक लोकांना मोठा धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बिलाल फैझी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले.


19 मातीची घरे कोसळली तर डोंगराळ भागात भूस्खलन


भूकंपाचा एवढा मोठा धक्का जाणवला की उभे असलेले लोक खाली कोसळेत. तर  वायव्य पाकिस्तानच्या अनेक ठिकांणी घरांचे छत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दुर्गम भागात किमान 19 मातीची घरे कोसळली आहेत. अफगाणिस्तानात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ताजिकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या भूकंपात 12 लोक जखमी झाले. भूकंपामुळे काही डोंगराळ भागात भूस्खलन होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.


या शक्तिशाली भूकंपामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील अनेक लोक त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेप पडून सैरावैरा झाले होते. काही जण इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणमधील श्लोकांचे पठण करत होते. शहरातील काही अपार्टमेंट इमारतींमध्ये भेगा पडल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान,  2005 मध्ये झालेल्या मोठ्या भूकंपाने हजारो लोकांना मृत्यू झाला होता. यावेळी रिस्टर स्केल 7.6 तीव्रतेचा भूंकप झाला होता. पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तर गेल्यावर्षी आग्नेय अफगाणिस्तानमध्ये, 6.1-रिश्टर स्केलच्या भूकंपाने झाला होता. अफगाणिस्तानच्या तालिबानमध्ये भूकंपाने 1,150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक जखमी झाले होते.