मोठी बातमी । संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ
Russia Ukraine Conflict : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला.
मास्को : Russia Ukraine Conflict : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरोधात (Russia-Ukraine War) अमेरिकेने सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र रशियाविरोधात भूमिका घेण्यास भारताने नकार दर्शवत मतदान केले नाही. त्यामुळे भारताने अप्रत्यक्षपणे रशियाला पाठिंबा असल्याचे सूचित केले. (Indirect Support to Russia)
11 देशांनी या ठरावाला पाठिंबा दिला तर तर 3 देश तटस्थ राहिले. अनुपस्थित राहणाऱ्यात भारत, चीन, यूएई हे देश होते. रशियाने या प्रस्तावाविरोधात अपेक्षेप्रमाणे व्हेटो पॉवर वापरली. भारत इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक समतोलाचा आदर करतो, असे भारताचे सुरक्षा परिषदेतले राजदूत टी. एस. तिरूमूर्ती यांनी म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहाटे राष्ट्र आणि जगाला संबोधित केले आणि म्हटले आमच्या आत्मसन्मानासाठी युक्रेनविरुद्ध शस्त्र कारवाई करीत आहोत. त्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्ला चढविण्यात सुरुवात केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाने शनिवारी युक्रेनवरील आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव रोखण्यासाठी आपल्या व्हेटो पॉवरचा वापर केला आणि शेजारील देशातून रशियन सैन्याची त्वरित आणि पूर्ण माघार घेण्याची मागणी केली.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. अडकलेल्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार विमाने पाठवणार आहे. रोमानिया आणि हंगेरी मार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यात येणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधावा आणि रोमानिया, हंगेरीच्या सीमांजवळ यावं, असं सांगण्यात आलंय. अडकलेल्या नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी रोमानिया, हंगेरीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या देशांच्या सीमांकडे येताना बस किंवा खासगी वाहनांमधून येताना भारताचा झेंडा लावावा, अशी सूचना देण्यात आली आहे.