Customer Give Tips To Waiter: जगात चांगुलपणाची अनेक उदाहरण आहेत. आपल्या हाताचं काढून इतरांना मदत करणारी देवासारखी माणसं आहे. या प्रचिती आपल्या पावलोपावली येत असते. याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर असतील. तुम्हीही कधी रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये जेवायला गेला असात तेव्हा वेटरला त्याने दिलेल्या सेवेसाठी टिप दिली असेल. काही लोक टिपमध्ये मोठी रक्कम देतात. त्यामुळे वेटरच्या आनंदाला पारावर उरत नाही. ऑनलाइन कॅम्पेन टिप्स फॉर जीसस (Tips For Jesus) प्रभावित होत काही जण रेस्टॉरंटमध्ये जाऊन मोठी रक्कम देऊन वेटर किंवा कर्मचाऱ्यांना (Customer Service) खूश करत आहेत. अशीच एक व्यक्ती अमेरिकेतील पेनसिल्वेनियामध्ये अल्फ्रेडो रेस्टॉरंटमध्ये जेवायला आली आणि एक हजार खाण्याऐवजी त्याला सुमारे 2 लाख रुपयांची टीप दिली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील पेनसिल्वेनियामध्ये अल्फ्रेडो कॅफे नावाचे एक ठिकाण आहे. या कॅफेत मारियाना लॅम्बर्ट नावाची महिला वेटर काम करते. तीन महिन्यांपूर्वी एक व्यक्ती कॅफेमध्ये आला आणि त्याने एक हजार रुपयांचे जेवण खाल्ले. पण जाताना 2 लाख रुपयांची टीप देऊन गेला. टिप देणाऱ्या एरिक स्मिथ सांगितले की, टिप्स फॉर जीससच्या मोहिमेमुळे प्रभावित झाल्याने असा निर्णय घेतला. पण दोन महिन्यांनंतर मारियानाला त्याच्या कृतीमुळे धक्काच बसला.


एरिक स्मिथने गेल्या महिन्यात रेस्टॉरंटला पत्र पाठवून पैसे परत करण्याची मागणी केली. तसेच क्रेडिट कार्डच्या चार्ज बॅक नियमांतर्गत परताव्यासाठी दावा दाखल केला आहे. रेस्टॉरंटने फेसबुकवर स्मिथशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला त्याने दाद दिली नाही. यानंतर रेस्टॉरंटने थेट कोर्टाकडे मोर्चा वळवला. रेस्टॉरंट मॅनेजर जॅक जेकबसन यांनी सांगितले की, या घटनेने माझी खूप निराशा झाली. एवढं चांगलं काम कोणीतरी करावं असं आम्हाला वाटत होतं, पण आता आमचा विश्वास उडाला आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.