नवी दिल्ली : चोर आणि दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम मशीन कापलं किंवा ट्रॅक्टरच्या मदतीने ते उखडून टाकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण आता आम्ही जे सांगणार आहोत ते क्वचितच कोणी ऐकलं असेल. एटीएमशी संबंधित हे एक प्रकरण परदेशातून समोर आलं. या ठिकाणी काही मुलांनी भंगारातून जुनी एटीएम मशीन विकत घेतलं आणि जणू हा त्यांना जॅकपॉट सापडला. त्यांना त्याच भंगारातून म्हणजेच एटीएममधून मोठी रोख रक्कम मिळाली.


असं उजळलं नशीब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंबहुना, या मुलांनी सुद्धा असा विचार केला नसेल की त्यांच्यासोबत असं काही घडेल. त्यांना मिळालेल्या या पैशांतून त्यांचा अनेक महिन्यांचा खर्च निघून जाईल. आता या घटनेचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर जोरदार शेअर केला जातोय. मुलांनी ही घटना सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर शेअर केली.


यानंतर न्यूज वेबसाइट ladbible.comच्या अहवालानुसार, या मुलांनी एक जुने एटीएम मशीन खरेदी केलं होतं. ज्यांच्या मेटल बॉक्समधून त्यांना 2000 डॉलर्स (सुमारे 1.5 लाख रुपये) मिळाले.


या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, ज्या व्यक्तीकडून मुलांनी हे मशीन विकत घेतलंय त्याच्याकडेही मशीनची चावी नव्हती. मशीनमध्ये रोख रक्कम आहे हे विक्रेत्यालाही माहिती नसणार. 


मशिनची चावी नसल्याने तेव्हा मुलांनी ठरवलं की मशीन तोडून टाकावं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांनी हॅमर, ड्रिल आणि इतर उपकरणांच्या मदतीने एटीएम उघडलं होतं.


लोकेशनबाबत खुलासा नाही


ही रक्कम मिळालेल्या मुलांपैकी एका मुलाने सांगितलं की, या एटीएमचा अगोदरचा मालक अशा जुन्या एटीएम मशिन खरेदी करत असतो. एके दिवशी त्याने हे एटीएम मशिन आम्हाला विकलं. जर आम्ही हे मशिन खरेदी केलं नसतं तर त्याने ते इतर कोणाला विकलं असतं. दरम्यान रिपोर्टमध्ये हे प्रकरणं कुठचं आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.